Ankita Lokhande : रियासोबत बिग बॉस प्रवेशाच्या चर्चा, अंकिता लोखंडे म्हणते…

अकिंतानं एक ट्विट करत आपण बिग बॉसच्या नव्या सीझनचा भाग नसल्याचं सांगितलं आहे. (Rumour about the entry in big boss house, Ankita Lokhande Said...)

Ankita Lokhande : रियासोबत बिग बॉस प्रवेशाच्या चर्चा, अंकिता लोखंडे म्हणते...
Follow us
| Updated on: Jun 27, 2021 | 4:31 PM

मुंबई : बिग बॉस सीझन (Big boss) 14 संपल्यापासून आता ‘बिग बॉस 15’ ची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळतेय. कोण स्पर्धक असणार काय टास्क असणार याबद्दल सोशल मीडियावर चर्चाही सुरू झाली आहे. अशात या नव्या सीझनची निर्मात्यांनी तयारी सुरू केली आहे अशी माहिती आहे. दरम्यान गेले अनेक दिवस बिग बॉसच्या घरात अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) एन्ट्री करणार अशी चर्चा रंगली होती. मात्र आता याबाबत स्वत: अंकितानं ट्विट करत माहिती दिली आहे.

अकिंतानं एक ट्विट करत आपण बिग बॉसच्या नव्या सीझनचा भाग नसल्याचं सांगितलं आहे. शिवाय या अफवा असल्याचं ही ती म्हणाली. यावर्षी या शोमध्ये सेलिब्रिटींसोबतच सामान्य नागरिकही या घरात असणार आहेत. शोबद्दल  नवीन अपडेट समोर आली होती. ज्यानुसार शोच्या निर्मात्यांनी यावर्षी शोमध्ये भाग घेण्यासाठी रिया चक्रवर्ती आणि अंकिता लोखंडेला संपर्क साधला असं म्हटलं गेलं होतं. मात्र आता या अफवांवर स्वत: अंकितानं पूर्णविराम लावला आहे.

काय म्हणाली अंकिता…

अंकितानं आज तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट करत म्हटलं, ”मी यावर्षी बिग बॉसमध्ये भाग घेईन असा अंदाज माध्यमांच्या काही घटकांकडून वर्तवला जात असल्याचं माझ्या निदर्शनास आलं आहे. मला त्यांना आणि तुम्हा सर्वांना हे सांगायचं आहे की मी शोचा भाग होणार नाही याची नोंद घ्यावी . माझ्या सहभागाची भूमिका निराधार आहे.

वाचा अकिंता लोखंडेचं ट्विट

यासोबतच रिया चक्रवर्तीसुद्धा या सीझनमध्ये येणार असल्याची चर्चा होती. अंकिता लोखंडे आणि रिया दोघींनीही अभिनेता सुशांत सिंहला डेट केलं होतं. सुशांतच्या मृत्यूनंतर दोघीही आमने सामने आल्या होत्या. अशा परिस्थितीत बिग बॉसच्या घरात दोन्ही अभिनेत्री एकत्र आल्या तर सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरू शकतो असं चाहत्यांना वाटत होतं. हे समोर येताच सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. चाहत्यांचं म्हणणं होतं की या दोघी अभिनेत्रींमध्ये सुशांतसिंह राजपूतवरुन वाद होऊ शकतो. ‘बिग बॉस’ 15 शो चे निर्माते नियोजन करत आहेत की ऑडिशनच्या माध्यमातून निवडले जाणारे सर्वसाधारण लोक आधी घरात ठेवले जातील.’बिग बॉस’ 15 मध्ये, सेलिब्रिटींच्या आधी सामान्य लोकांना घरात आणलं जाईल.

संबधित बातम्या

‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाचं चित्रिकरण पूर्ण, आलिया भट्टची इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट

Angira Dhar : अंगिरा धर आणि आनंद तिवारी लग्नबंधनात, लग्नातील भावनिक क्षण सोशल मीडियावर शेअर

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.