Bhoot Police Trailer : तांत्रिक बनून सैफ अली खान आणि अर्जुन कपूर भूतांना पळवणार, पाहा ‘भूत पोलीस’चा ट्रेलर..

सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. चाहते त्याच्या ‘भूत पोलीस’ (Bhoot Police) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Bhoot Police Trailer : तांत्रिक बनून सैफ अली खान आणि अर्जुन कपूर भूतांना पळवणार, पाहा ‘भूत पोलीस’चा ट्रेलर..
Bhoot police
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 12:54 PM

मुंबई : सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. चाहते त्याच्या ‘भूत पोलीस’ (Bhoot Police) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यामी गौतम (Yami Gautam) आणि जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) या चित्रपटात सैफ आणि अर्जुनसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आज (18 ऑगस्ट) या हॉरर-कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अर्जुन कपूरने चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

ट्रेलर शेअर करताना अर्जुन कपूरने लिहिले की, ‘ही हॉरर-कॉमेडी अद्वितीय आहे आणि ट्रेलर देखील नवीन आहे. जर तुम्हाला भुतांना घाबरवायचे असेल, तर हा ट्रेलर लगेचच पहा. ‘भूत पोलीस’ या 17 सप्टेंबरला येत आहे.’

अर्जुन कपूरची पोस्ट

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

पाहा ट्रेलर

2 मिनिटे 48 सेकंदांच्या ट्रेलरची सुरुवात, सैफ अली खान आणि अर्जुन कपूर एकत्र भूत पळवताना दिसणार आहे. त्यानंतर तो भूत काढण्यासाठी काही गावात जातो. जिथे अर्जुनला वाटतं तिथे भूत आहे, पण सैफ अली खान त्याच्या बोलण्याला गमतीत घेतो. तो म्हणतो की, प्रत्यक्षात भूत कधीच नसत. दुसरीकडे, अर्जुन कपूर भूत घालण्यासाठी एका पुस्तकाचा वापर करतो. या पुस्तकाचे नाव आहे ‘बाबा की किताब’. त्यानंतर जॅकलिन आणि यामी गौतमची एन्ट्री होते.

यामी आणि जॅकलिनच्या एन्ट्रीनंतर, प्रत्यक्षात एक भूत येते. यानंतर ते चौघे एकाच ठिकाणी ते शोधायला जातात. यानंतर, भूत पळून जाईल किंवा नाही, यासाठी चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रतीक्षा करावी लागेल. हा चित्रपट आधी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता, पण कोरोना महामारीमुळे तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

‘भूत पोलीस’ रिलीजबद्दल बोलायचे झाले, तर हा चित्रपट 17 सप्टेंबरला डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पवन कृपलानी यांनी केले आहे.

हेही वाचा :

तालिबानी टेररची थेट हिंदुत्वाशी तुलना, #ArrestSwaraBhasker ट्रेंड करत स्वरा भास्कर पुन्हा सोशल मीडियावर ट्रोल!

‘सैराट’च्या ‘आर्ची’ची मोठी झेप, अभिनेत्री रिंकू राजगुरू दिसणार नेटफ्लिक्सच्या आगामी चित्रपटात!

Afghanistan Taliban Crisis : जेव्हा हेमा मालिनी ‘धर्मात्मा’च्या चित्रीकरणासाठी अफगाणिस्तानला पोहचल्या होत्या, कशी होती तेव्हाची परिस्थिती? जाणून घ्या…

Sonam Kapoor : बहीण रियाच्या लग्नात सोनम कपूर झाली भावूक, जिजू करणसाठी लिहिली ‘ही’ खास गोष्ट

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.