‘सैफ अली खान’चा मुलगा बाॅलिवूडमध्ये करणार पदार्पण, करण जोहरच्या चित्रपटात काजोलसोबत महत्वाच्या भूमिकेत
करण जोहरच्या चित्रपटात इब्राहिम एका महत्वाच्या भूमिकेत असणार आहे.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम अली खान लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. करण जोहरच्या चित्रपटात इब्राहिम एका महत्वाच्या भूमिकेत असणार आहे. विशेष म्हणजे करण जोहरसोबतच अभिनेत्री काजोल ही देखील इब्राहिमला बाॅलिवूड पदार्पणामध्ये मदत करणार आहे. करण जोहर आणि काजोलने अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून एक चर्चा होती की, करण जोहर आणि काजोलमध्ये काहीतरी बिनसले आहे. परंतू तब्बल 12 वर्षांनंतर आता करण जोहरच्या चित्रपटात काजोल दिसणार आहे.
2010 नंतर करण जोहर आणि काजोल यांनी कोणताच प्रोजेक्टसोबत केला नाहीये. नुकताच आता काजोल हिने करण जोहरच्या प्रोडक्शन हाऊसचा चित्रपट साइन केला आहे. कयोज इराणी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.
काजोलने जो चित्रपट साईन केला आहे, त्यामध्ये सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान महत्वाच्या भूमिकेत आहे. आता काजोल आणि इब्राहिम बाॅक्स आॅफिसवर काय धमाका करतात हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून सैफ अली खान हा आपला मुलगा इब्राहिमला बाॅलिवूडमध्ये लाॅन्च करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतोय. आता शेवटी सैफ अली खानच्या मुलाला करण जोहर बाॅलिवूडमध्ये लाॅन्च करणार आहे.
काजोल आणि इब्राहिम यांच्या चित्रपटाचे नाव अजून कळू शकले नाहीये. परंतू लवकरच करण जोहर हा चित्रपटाचे नाव घोषित करेल असे सांगितले जात आहे. मात्र, करण जोहर इब्राहिमला लाॅन्च करणार असल्याच्या बातम्या पसरल्यापासून करणवर टीका केली जात आहे.
सारा अली खानने आपल्या अभिनयाने बाॅलिवूडमध्ये एक वेगळी ओळख मिळवली आहे. इतकेच नाही तर साराच्या हातामध्ये अजून बरेच चित्रपट आहेत. आता इब्राहिम काय धमाका करतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे.