‘सलाम बॉम्बे’साठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारा मुलगा आता उदरनिर्वाहासाठी चालवतो रिक्षा; स्टारडम मिळूनही बदललं नाही आयुष्य

चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा कृष्णा म्हणजेच 'चाय पाव' ही सर्वांच्या मनात घर करून बसली होती. ही व्यक्तिरेखा बालकलाकार शफिक सय्यदने (Shafiq Syed) साकारली होती. यासाठी शफिक सय्यदला राष्ट्रीय पुरस्कारही (National Award) मिळाला होता.

'सलाम बॉम्बे'साठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारा मुलगा आता उदरनिर्वाहासाठी चालवतो रिक्षा; स्टारडम मिळूनही बदललं नाही आयुष्य
'सलाम बॉम्बे'साठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारा मुलगा आता उदरनिर्वाहासाठी चालवतो रिक्षाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 12:40 PM

तुम्हाला ‘सलाम बॉम्बे’ (Salaam Bombay) हा चित्रपट आठवतोय का? मीरा नायर यांचा 1988 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट, ज्यात मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या मुलांचं दैनंदिन जीवन आणि त्यांच्या त्रासाचं चित्रण करण्यात आलं होतं. हा चित्रपट भारताने 61 व्या ऑस्कर पुरस्कारसाठीही पाठवला होता. ‘सलाम बॉम्बे’मध्ये रघुबीर यादव, इरफान, अनिता कंवर आणि नाना पाटेकर यांच्यासह अनेक कलाकार होते, ज्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षक प्रभावित झाले होते. पण या चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा कृष्णा म्हणजेच ‘चाय पाव’ ही सर्वांच्या मनात घर करून बसली होती. ही व्यक्तिरेखा बालकलाकार शफिक सय्यदने (Shafiq Syed) साकारली होती. यासाठी शफिक सय्यदला राष्ट्रीय पुरस्कारही (National Award) मिळाला होता. यानंतर शफीक सय्यद 1993 मध्ये फक्त एका चित्रपटात दिसला आणि तेव्हापासून ते इंडस्ट्रीपासून दूर आहे.

29 वर्षांपासून शफिक सय्यद चित्रपटांपासून दूर

29 वर्षांपासून शफिक सय्यद कुठे आहे आणि तो सध्या काय करत आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? शफिक सय्यदने वयाच्या 12व्या वर्षी ‘सलाम बॉम्बे’ या चित्रपटात काम केलं. या चित्रपटातील दमदार अभिनयासाठी त्याचं सर्वत्र कौतुक झालं. शफिकच्या नावाची ऑस्करमध्ये चर्चा झाली आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. पण ती प्रसिद्धी कायम राहू शकली नाही.

मुंबई पाहण्यासाठी मित्रांसह घरातून पळून आला

शफीक सय्यदला ‘सलाम बॉम्बे’मधून स्टारडम मिळाला. यानंतर त्याच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. चित्रपटातून नाव कमावणार आणि भरपूर काम करेन असं त्याला वाटलं होतं. पण दुर्दैवाने हे होऊ शकलं नाही. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि आर्थिक अडचणींमुळे त्याने अभिनय सोडलं. शफीकला ‘सलाम बॉम्बे’ची ऑफर मिळणं हा एक चमत्कारच होता. त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, 1986 मध्ये तो काही मित्रांसह मुंबईला पळून आला होता. मुंबई शहर कसं आहे ते त्याला पाहायचं होतं. राहायला जागा नसल्याने शफीक आणि त्याचे मित्र चर्चगेट फूटपाथवर थांबले होतं.

हे सुद्धा वाचा

एका महिलेनं 20 रुपये प्रतिदिन देऊन अभिनयाची वर्कशॉप करून घेतली

एके दिवशी शफीक सय्यदचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. एक महिला शफीक आणि त्याच्या मित्रांकडे आली आणि म्हणाली की जर ते त्यांच्या अभिनय कार्यशाळेत सहभागी झाले तर त्यांना दररोज 20 रुपये मिळेल. मुलांचं शोषण करण्याचा हा डाव असल्याचं समजून शफिक सय्यदच्या मित्रांनी पळ काढला. मात्र शफिक तिथेच थांबला आणि महिलेचा सल्ला ऐकून तिच्यासोबत गेला. दिवसाला 20 रुपये मिळाले तर तो चित्रपट आनंदाने बघू शकेल आणि त्याची आवडती भेळपुरीही खायला मिळेल याचा आनंद त्याला झाला होता.

120 मुलांमधून शफिकची ‘चाय पाव’च्या भूमिकेसाठी निवड

शफीकने 13 वर्षांपूर्वी ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, अभिनय कार्यशाळेत सुमारे 120 मुलं होती आणि स्क्रीन चाचणीनंतर त्याची निवड कृष्णा म्हणजेच चाय पाव या मुख्य भूमिकेसाठी करण्यात आली. शफीकने ‘सलाम बॉम्बे’साठी 52 दिवस शूटिंग केलं होतं आणि त्यासाठी निर्मात्यांनी त्याला 15,000 रुपये दिले होते. शफीकच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा तो हिट झाला आणि त्याने शफीकला एक हिट चाइल्डस्टार बनवलं होतं. मीरा नायर यांनी नंतर त्याला त्यांच्या ‘पतंग’ चित्रपटासाठीही साइन केलं.

स्टारडम नाहीसा झाला, शफिक घरी परतल्यावर रिक्षा चालवू लागला

पण त्यानंतर जे घडलं, त्याची कल्पनाही कोणी केली नसेल. शफिक पुन्हा मुंबईच्या रस्त्यांवर राहू लागला. त्याच्याकडे राहायला जागा नव्हती. कामाच्या शोधात तो निर्मात्यांचे दरवाजे ठोठावत होता. जवळपास आठ महिन्यांच्या प्रयत्नांनंतरही त्याला यश मिळालं नाही. अखेर निराश झालेला शफिक बेंगळुरू इथल्या आपल्या घरी परतला.

शफीक आता विवाहित असून चार मुलांचा बाप आहे

शफिकने ‘द टेलिग्राफ’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, त्याचं खरं आयुष्य ‘सलाम बॉम्बे’मधील चाय पावसारखंच आहे. उदरनिर्वाहासाठी त्यांने मिळेल ते काम केलं. त्याने रिक्षा चालवली आणि त्यातून दिवसाला फक्त 150 रुपये मिळायचे. त्याने लाईटमॅन म्हणूनही काम केलं, ज्यामध्ये त्याला आठ तासांच्या शिफ्टसाठी 200-300 रुपये मिळायचे. शफिक अजूनही रिक्षा चालवतो. तो विवाहित असून त्याला चार मुलं आहेत.

टीव्हीच्या प्रॉडक्शन युनिटला करतो मदत

आर्थिक परिस्थितीमुळे शफिकच्या दोन मुलांची शाळा सुटली. शफिकला अजूनही वाचता येत नाही याची खंत आहे. आज त्याचं शिक्षण झालं असतं तर तो अभिनेता झाला असता आणि आपल्या मुलांनाही चांगलं भविष्य देऊ शकला असता, असं तो म्हणतो. शफीक सध्या बेंगळुरूमध्ये रिक्षा चालवण्याव्यतिरिक्त कन्नड फिल्म इंडस्ट्रीच्या टीव्ही प्रॉडक्शन युनिटमध्ये सहाय्यक म्हणून काम करतो.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.