सलमान खान आणि शाहरुख खान पुन्हा एकदा धमाका करण्यास तयार, या महिन्यात सुरू होणार टायगर 3 चित्रपटाचे शूटिंग
सलमान खान आणि शाहरुख खान या दोघांनाही बाॅलिवूडचे किंग म्हटले जाते. चित्रपटात असे दाखवण्यात आले आहे की, ज्यावेळी पठाण हा अडचणीत होता, त्यावेळी सलमान खान त्याच्या मदतीला आला.
मुंबई : शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाल करत आहे. शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. झिरो चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर गेला होता. मध्यंतरी चर्चा होत्या की, बाॅलिवूडला कायमचा रामराम शाहरुख खान हा करणार आहे. मात्र, पठाण चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान याने दणदणीत पुनरागमन नक्कीच केले आहे. मात्र, पठाण चित्रपटामध्ये शाहरुख खान याच्या मदतीला धावून सलमान खान (Salman Khan) हा आला. सलमान खान याचा कॅमिओ पठाण चित्रपटामध्ये दिसला. सलमान खान याची झलक पठाण चित्रपटामध्ये बघायला मिळणार असल्याने चाहत्यांमध्ये मोठा उत्साह होता. सलमान खान आणि शाहरुख खान या दोघांनाही बाॅलिवूडचे किंग म्हटले जाते. चित्रपटात असे दाखवण्यात आले आहे की, ज्यावेळी पठाण हा अडचणीत होता, त्यावेळी सलमान खान त्याच्या मदतीला आला.
पठाण हा चित्रपट रिलीज होऊन 25 दिवस उलटले आहेत. तरीही बाॅक्स आॅफिसवर पठाण चित्रपटाची जादू बघायला मिळत आहे. पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठा विरोध चित्रपटाला होत होता. या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सातत्याने केली जात होती.
शाहरुख खान आणि सलमान खान यांना परत एकदासोबत पाहण्यास चाहते इच्छुक आहेत. आगामी टायगर 3 या चित्रपटामध्ये सलमान खान आणि शाहरुख खान यांची जोडी परत एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान आणि सलमान खान यांच्या शूटिंगसाठी खास सेटही तयार करण्यात येतोय.
रिपोर्टनुसार शाहरुख खान आणि सलमान खान त्यांचे सीन हे एप्रिल 2023 मध्ये शूट करणार आहेत. विशेष म्हणजे अशीही माहिती मिळत आहे की, शाहरुख खान याची केसांची स्टाईल टायगर 3 मध्ये थोडी वेगळी बघायला मिळू शकते. पठाण चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि सलमान खान यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली.
पठाण चित्रपटाची जादू अजूनही बाॅक्स आॅफिसवर कायम आहे. चित्रपट निर्मात्यांनी मोठा निर्णय घेत चित्रपटाच्या तिकिटाच्या दरामध्ये मोठी कपात केली आहे. पठाण चित्रपटामुळे दुसरीकडे शहजादा या चित्रपटाला मोठा फटका बसला आहे. पठाण चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये अजूनही क्रेझ बघायला मिळत आहे. शहजादा या चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळत नाहीये.