Salman Khan | युवा अभिनेत्यांना सलमान खान याने दिला हा मोठा इशारा, अभिनेता म्हणाला, आम्ही पाच जण

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खान याला ईमेल करून थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ केली. आता सलमान खान हा त्याने केलेल्या एका विधानामुळे चर्चेत आहे.

Salman Khan | युवा अभिनेत्यांना सलमान खान याने दिला हा मोठा इशारा, अभिनेता म्हणाला, आम्ही पाच जण
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 3:01 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा कायमच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी सलमान खान (Salman Khan) याला ईमेल करून थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सलमान खान याला ही धमकी मिळाल्यानंतर लगेचच त्यांच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ करण्यात आली. सलमान खान याला येणाऱ्या सततच्या धमक्यांनंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ केलीये. फक्त मुंबई पोलिसच नाहीतर खासगी सुरक्षारक्षकही सलमान खान याच्या सुरक्षेमध्ये तैनात करण्यात आले आहेत. सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमकीचा ईमेल पाठवणाऱ्या पोलिसांनी अटक केली आहे.

लॉरेन्स बिश्नोई याने काही दिवसांपूर्वीच जेलमधून एका मुलाखत दिली, या मुलाखतीमध्येही सलमान खान याला जीवे मारायचे असल्याचे म्हणताना लॉरेन्स बिश्नोई हा दिसला. इतकेच नाहीतर या मुलाखतीमध्ये सलमान खान याला जीवे मारण्याची कारणे थेट लॉरेन्स बिश्नोई याने सांगून टाकले आहे. लॉरेन्स बिश्नोई याने संपूर्ण बिश्नोई समाजाची माफीही सलमान खान याला मागायला सांगितली.

लॉरेन्स बिश्नोई याने अगोदर सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यानंतर त्याला धमकीचा ईमेलही पाठवण्यात आला. सलमान खान याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने चाहतेही टेन्शनमध्ये आहेत. जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर सलमान खान याने याला फार काही गांर्भीयाने घेतले नाहीये.

नुकताच सलमान खान हा एक पुरस्कार सोहळ्यात पोहचला होता. यावेळी सलमान खान याने उघडपणे बाॅलिवूडच्या फ्लाॅप जाणाऱ्या चित्रपटांवर भाष्य केले. आता सलमान खान याने एक प्रश्नाचे उत्तर देताना नव्या कलाकारांबद्दलही मोठे भाष्य केले आहे. आता सलमान खान याने केलेल्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

सलमान खान म्हणाला की, शाहरुख खान, आमिर खान, अजय देवगण, अक्षय कुमार आणि मी नव्या अभिनेत्यांना सोडणार नाहीत. मुळात म्हणजे नवे अभिनेते खूप जास्त मेहनती आहेत. परंतू आम्ही पाचजण इतक्या लवकर हार मानणार नाहीत. आम्ही इतक्या लवकर रिटायरपण होणार नाहीत.

पुढे सलमान खान हा म्हणाला की, मुळात म्हणजे आमच्या पाचजणांचे चित्रपटही चांगले चालतात आणि आम्ही फिस देखील वाढवतो. इतकेच नाहीतर आमचे चित्रपट चालले नाहीत तरीही आम्ही फिस वाढवणार असल्याचे म्हणताना देखील सलमान खान दिसला. सलमान खान याने हे स्पष्ट केले आहे की, आम्ही पाचजण आताच कोणत्याही प्रकारची रिटायरमेंट घेणार नाहीत.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.