Salman Khan Troll | ‘मास्क न वापरणारा व्यक्ती जेव्हा मास्क लावतो…’, उलटा मास्क परिधान करणारा सलमान खान होतोय ट्रोल!

बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) अलीकडेच ‘टायगर 3’चे शूटिंग मधूनच सोडून मुंबईत परतला आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना सलमान खानचा खास लूक पाहायला मिळाला आहे. बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान त्याच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतो.

Salman Khan Troll | ‘मास्क न वापरणारा व्यक्ती जेव्हा मास्क लावतो...’, उलटा मास्क परिधान करणारा सलमान खान होतोय ट्रोल!
Salman Khan
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 2:02 PM

मुंबई : बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) अलीकडेच ‘टायगर 3’चे शूटिंग मधूनच सोडून मुंबईत परतला आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना सलमान खानचा खास लूक पाहायला मिळाला आहे. बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान त्याच्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतो. दरवर्षी सलमान खान त्याच्या चाहत्यांसमोर एकापेक्षा एक उत्तम चित्रपट सादर करतो. सलमान खानचे चाहते त्याची एका झलक मिळवण्यासाठी वेडे झालेले असतात. अशा परिस्थितीत अलीकडेच सलमान खान विमानतळावर वेगळ्या स्टाईलमध्ये दिसला आहे.

वास्तविक सलमान खान काही दिवसांपूर्वी रशियाला त्याचा आगामी चित्रपट ‘टायगर 3’च्या शूटिंगसाठी गेला होता. मात्र, आता अभिनेता मुंबईत परतला आहे, आणि विमानतळावर स्पॉट झाला होता. या दरम्यान, अभिनेत्याचे असे फोटो समोर आले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

सलमान खान मुंबईत परतला

विमानतळावरून बाहेर पडलेल्या सलमान खानच्या या फोटोंमध्ये, अभिनेत्याने स्वतःला पूर्णपणे कसे झाकले, हे पाहायला मिळते आहे. यावेळी सलमान खान डोक्यावर मोठी टोपी, काळा मास्क, निळा जॅकेट परिधान केलेला दिसला. अभिनेत्याची ही शैली मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

‘टायगर 3’चे शूटिंग मध्यातच सोडून सलमान मुंबईत परतल्याचे स्पष्ट झाले आहे. होय, सलमानच्या चित्रपटाचे शूटिंग अजून पूर्ण झालेले नाही, पण तो ‘बिग बॉस 15’साठी मुंबईत परतला आहे. 2 ऑक्टोबर रोजी ‘बिग बॉस 15’ चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

अशा परिस्थितीत गेल्या दीड महिन्यांपासून परदेश दौऱ्यावर असलेला सलमान खान रविवारी भारतात परतला आहे. बिग बॉस 15 होस्ट करण्यासाठी सलमान मुंबईत परतला आहे. आता तो बिग बॉस 15 चे शूटिंग इथे पूर्ण करेल. दुसरीकडे, काही युजर्स सलमान खानला ट्रोलही करत आहेत.

सलमान खान ट्रोल

सलमान खान जेव्हा विमानतळावर दिसला, त्यावेळी त्याने उलटा मास्क परिधान केला होता. अशा परिस्थितीत, एका वापरकर्त्याने अभिनेत्याच्या या लूकवर लिहिले की, ‘आधी मास्क तरी नीट लावायचा…’, तर दुसरा एक म्हणाला की, ‘मास्क उलटा आहे’. एका युजरने लिहिले की, ‘जेव्हा कधीही मास्क न घालणाऱ्या व्यक्तीला मास्क घालावा लागतो, तेव्हा तो पुरावा असतो…सलमानचा रिव्हर्स मास्क हा याचाच पुरावा आहे.’

लवकरच, तो ‘बिग बॉस 15’चा भव्य प्रीमियर शूट करेल. बिग बॉस 15च्या शूटिंगनंतर तो टायगर 3च्या शूटिंगसाठी परदेशात परत जाईल. टायगर 3मध्ये कतरिना कैफ आणि सलमान खान पुन्हा एकदा धमाल करणार आहेत.

हेही वाचा :

Aai Kuthe Kay Karte | देशमुखांच्या घरात अखेर नवी सून प्रवेश करणार, अभिषेक-अनघा लवकरच लग्नबंधनात अडकणार!

‘जे निर्णय घ्याल, त्याची जबाबदारी देखील घ्या…’, राज कुंद्राच्या जामिनानंतर शिल्पा शेट्टीची पोस्ट चर्चेत!

Thalaivii :  ‘थलायवी’मुळे कंगना रनौतला कायमस्वरूपी ‘स्ट्रेच मार्क्स’, अवघ्या सहा महिन्यात वजन वाढून केले होते कमी!

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.