Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असे काय घडले की, सलमान खान चक्क बाॅलिवूड सोडून जातोय….

गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काही खास कमाल करू शकत नाहीयेत. इतकेच नाहीतर प्रेक्षक बाॅलिवूड चित्रपटांवर बहिष्कार देखील टाकत आहेत.

असे काय घडले की, सलमान खान चक्क बाॅलिवूड सोडून जातोय....
Follow us
| Updated on: Oct 02, 2022 | 11:45 AM

मुंबई : सलमान खान (Salman Khan) आणि चिरंजीवीचा गॉड फादर हा चित्रपट दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच 5 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सलमान खानने गॉड फादर (Godfather) या चित्रपटात कॅमिओ केलाय. थोडक्यात काय तर सलमानने साऊथ सिनेमात पदार्पण केले म्हटले तर वावगे नक्कीच ठरणार नाही. काही दिवसांपूर्वीच गॉड फादर चित्रपटाचे टीझर (Teaser) रिलीज झालंय. या टीझरमध्ये सलमान खान आणि चिरंजीवी एकदम जबरदस्त अशा अॅक्शन मोडवर दिसत आहेत. गॉड फादर चित्रपटाच्या माध्यमातून सलमान खान साऊथमध्ये छाप सोडण्यास सज्ज आहे.

नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात सलमान खानने अत्यंत मोठे विधान करून चर्चांना पेव फोडले आहे. सलमान खानने बोलताना चक्क टॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त करून टाकलीये. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर काही खास कमाल करू शकत नाहीयेत. इतकेच नाहीतर प्रेक्षक बाॅलिवूड चित्रपटांवर बहिष्कार देखील टाकत आहेत. यामध्ये सलमानने टॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याने चर्चांना उधाण आलंय.

बाॅलिवूडच्या चित्रपटांपेक्षा आता सलमान खानला साऊथच्या चित्रपटामध्ये जास्त रस असल्याचे दिसून येतंय. गॉड फादरला मिळत असलेला प्रतिसाद पाहून सलमान खान भारावून गेलाय. त्यामुळे सलमान खानने टॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे बोलले जातंय. यावेळी बोलताना सलमानने हेही म्हटले आहे की, काही लोकांना हाॅलिवूडमध्ये जायचे आहे…पण मला टॉलीवूडमध्ये यायचे आहे…

कोरोनाच्या काळानंतर बाॅक्स ऑफिसवर बाॅलिवूडचे चित्रपट फेल जात आहेत. जे चित्रपट बनवण्यासाठी 500 कोटी खर्च करण्यात आले. अशा चित्रपटांना बाॅक्स ऑफिसवर 300 कोटींचा आकडा देखील पार करता येत नाहीये. यामुळे बाॅलिवूडमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आमिर खान, अक्षय कुमार यांच्यासारख्या स्टारचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर कमाई करू शकले नाहीयेत. त्या तुलनेत बाॅक्स ऑफिसवर साऊथचे चित्रपट जोरदार कमाई करत आहेत. यामुळेच अनेकांनी आपले पाय आता साऊथकडे वळल्याचे दिसतंय.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.