Salman Khan | सतीश कौशिक यांच्या अत्यसंस्कारावेळी सलमान खान झाला भावूक, अश्रू रोखताना…
सतीश कौशिक यांच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. बाॅलिवूडमधील सर्वच स्टार यांना धक्का बसला. अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी शेअर केली.
मुंबई : सतीश कौशिक यांच्या निधनाने संपूर्ण बाॅलिवूड विश्वावर शोककळा पसरलीये. दुसरीकडे चाहत्यांचे अश्रू थांबण्याचे नाव घेत नाही. वयाच्या 66 व्या वर्षी सतीश कौशिक यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचे निधन झाले. अनुपम खेर यांनी सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी शेअर केलीये. सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट अनुपम खेर यांनी शेअर केली. अनुपम खेर यांच्या पोस्टनंतर सर्वच बाॅलिवूड स्टारने जुन्या आठवणींना उजाळा देत सतीश कौशिक श्रद्धांजली वाहिली. दिल्ली येथून सतीश कौशिक यांचे पार्थिव हे मुंबईमध्ये आणले गेले.
सतीश कौशिक यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी सलमान खान याच्यापासून रणबीर सिंह याच्यापर्यंत जवळपास सर्वचजण उपस्थित होते. सतीश कौशिक यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी अनुपम खेर हे पोहचले होते. यावेळी अनुपम खेर हे ढसाढसा रडताना दिसले. अनुपम खेर आणि सतीश कौशिक हे खास मैत्र होते. गेल्या कित्येक वर्षांपासून यांनी सोबत कामही केले.
FIRST TIME saw Salman Khan CRYING in Public outside Satish Kaushik House ???#SalmanKhan? #SatishaKaushik #SatishKaushikDeath pic.twitter.com/UDVSpx5Pwz
— Salman Khan & Shah Rukh Khan Fan Pakistan ?? (@Janiking787) March 10, 2023
आता सलमान खान याचे काही व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. सलमान खान हा सतीश कौशिक यांच्या अंतिम दर्शनासाठी पोहचला होता. यावेळी सलमान खान याला आपले अश्रू रोखणे अवघड झाल्याचे दिसत आहे. एका व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सलमान खान हा गर्दीमध्ये उभा आहे आणि तो अत्यंत भावूक झालाय. अश्रू रोखण्यासाठी तो सतत आकाशाकडे पाहात आहे.
दुसऱ्या व्हिडीओमध्ये सलमान खान हा गाडीमध्ये बसलेला दिसत असून सलमान खान याच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर हात फिरवत आपले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करताना सलमान खान हा दिसत आहे. आता सलमान खान याचे हे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत.
Salman Khan at Satish Kaushik ji’s funeral!#salmankhan#SatishaKaushik#RipLegend @LegendSKFan @Freak4Salman @Beingtiger78 pic.twitter.com/J7vQGB9MxU
— ❥ʀᴀᴅʜᴇ (@beingradhe784) March 9, 2023
सलमान खान याचे हे व्हिडीओ बघितल्यानंतर त्याचे चाहते देखील भावनिक झाले आहेत. सतीश कौशिक आणि सलमान खान यांच्यामध्ये खास मैत्री होती. 2003 च्या अगोदर सलमान खान याचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर सतत फ्लाॅप जात होते. जवळपास अर्धा डजन चित्रपट सलमान खान याचे फ्लाॅप गेले होते.
त्यानंतर सलमान खान याने सतीश कौशिक यांच्या तेरे नाम चित्रपटामध्ये भूमिका साकारली आणि हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर हिट ठरला. यानंतर सतीश कौशिक आणि सलमान खान यांच्यामध्ये खास मैत्रीचे नाते तयार झाले. सतीश कौशिक यांच्या निधनाची बातमी कळताच सलमान खान याने सोशल मीडियावरही एक पोस्ट शेअर केली होती.
Salman Khan at Satish Kaushik’s last rites… #SalmanKhan #SatishaKaushik #ripsatishkaushikji pic.twitter.com/bnBJ13l1wS
— Priyani Salmanic… (@PriyaniMahapat2) March 10, 2023
नेहमीच दबंग स्टाईलमध्ये राहणारा बाॅलिवूडचा दबंग खान याला रडताना पाहून आता चाहते देखील भावूक झाले आहेत. सतीश कौशिक हे 7 मार्चला आयोजित मुंबईमधील एक होळीला पार्टीला देखील पोहचले होते. त्यानंतर ते कुटुंबियांसोबत होळी खेळण्यासाठी दिल्लीला गेले. याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला.