Salman Khan | चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच भाईजानच्या पुढील शेड्यूलच्या शूटिंगला सलमान खान सुरुवात करणार…

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खान सध्या दुबईत सुट्टी घालवत आहे. सलमान खान लवकरच मुंबईत परतणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील महिन्यात सप्टेंबरमध्ये त्याच्या आगामी भाईजान' चित्रपटाच्या पुढील शेड्यूलचे शूटिंग सुरू करणार आहे.

Salman Khan | चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच भाईजानच्या पुढील शेड्यूलच्या शूटिंगला सलमान खान सुरुवात करणार...
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 8:57 AM

मुंबई : बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार अभिनेता सलमान खान नेहमीच चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी सलमान आणि सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर सलमान खान आणि त्याच्या वडिलांची सुरक्षा वाढवण्यात आली. सलमान खान (Salman Khan) साऊथ स्टार किच्चा सुदीपच्या ‘विक्रांत रोना’ या चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये दिसला होता. सलमान लवकरच त्याच्या आगामी ‘भाईजान’ या चित्रपटाचे पुढील शेड्यूल शूट करणार आहे. सलमान भाईजान (Bhaijaan) चित्रपटाचे शूट करणार असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साह दिसून येतोयं.

सप्टेंबरमध्ये आगामी ‘भाईजान’ चित्रपटाचे शूटिंग सलमान सुरू करणार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खान सध्या दुबईत सुट्टी घालवत आहे. सलमान खान लवकरच मुंबईत परतणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील महिन्यात सप्टेंबरमध्ये त्याच्या आगामी भाईजान चित्रपटाच्या पुढील शेड्यूलचे शूटिंग सुरू करणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून सलमान खान टायगर 3 चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. टायगर 3 चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.

सलमान खानचा तुर्की गायक अब्दू रोजिकसोबतचा फोटो व्हायरल

टायगर 3 या चित्रपटात अभिनयासोबतच सलमान त्याची निर्मितीही करत आहे. त्याच वेळी, सलमान खान नच बलिए या टीव्ही शोची निर्मिती करत आहे आणि लवकरच बिग बॉसच्या पुढील सीझनचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. सलमान खानचा तुर्की गायक अब्दू रोजिकसोबतचा फोटो व्हायरल झाला होता. यानंतर अब्दू रोजिकने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि त्याने सांगितले की, सलमान खानच्या चित्रपटात तो काम करणार आहे.

भाईजानला पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक

सलमान खानचा चित्रपट भाईजान हा एक कॉमेडी चित्रपट असेल. या चित्रपटात सलमान खानशिवाय अभिनेत्री पूजा हेगडेही दिसणार आहे. अब्दू रोजिकच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलायचे झाले तर तो या चित्रपटात एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, चाहते सलमान खानच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आपल्या भाईजानला पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक दिसत आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.