Tiger 3 : ‘टायगर 3’च्या सेटवरून सलमान खानचा फर्स्ट लूक लीक, लांब केस आणि दाढीमध्ये भाईजानला ओळखणं कठीण

सलमान खानच्या व्हायरल लुकमध्ये तो लांब तपकिरी केस आणि दाढीमध्ये दिसत आहे. यासोबतच त्यानं कपाळावर लाल पट्टी बांधली आहे. या लूकमध्ये सलमान खानला ओळखणं कठीण झालंय. (Salman Khan's first look leaked from the set of 'Tiger 3', it's hard to recognize him in long hair and beard)

Tiger 3 : 'टायगर 3'च्या सेटवरून सलमान खानचा फर्स्ट लूक लीक, लांब केस आणि दाढीमध्ये भाईजानला ओळखणं कठीण
Follow us
| Updated on: Aug 22, 2021 | 1:36 PM

मुंबई : सलमान खान (Salman Khan) आणि कतरिना कैफच्या (Katrina Kaif) ‘टायगर 3’ (Tiger 3) या चित्रपटाची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. सलमान आणि कतरिना ‘टायगर 3‘ च्या शूटिंगसाठी शुक्रवारी रशियाला रवाना झाले होते. त्यांनी या चित्रपटाचं शूटिंगही सुरू केलं आहे. आता या चित्रपटाच्या सेटवरील सलमान खानचा फर्स्ट लूक व्हायरल झाला आहे.

सलमान आणि कतरिना रशियाच्या सेंट पीटर्सबर्गमध्ये ‘टायगर 3’ चं शूटिंग करत आहेत. रशियाला पोहचताच ते अॅक्शन सीक्वेन्स शूट करत आहेत. यामध्ये सलमान एका कारचा पाठलाग करणारा सिक्वन्स शूट करत आहे. सलमानचा लूक चित्रपटाच्या सेटवरून व्हायरल झाला आहे या लूकमध्ये मात्र त्याला ओळखणं कठीण आहे.

सलमानचा लूक झाला व्हायरल

सलमान खानच्या व्हायरल लुकमध्ये तो लांब तपकिरी केस आणि दाढीमध्ये दिसत आहे. यासोबतच त्यानं कपाळावर लाल पट्टी बांधली आहे. या लूकमध्ये सलमान खानला ओळखणं कठीण होत आहे. त्याचे हे फोटो आता तुफान व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये सलमान खानसोबत त्याचा भाऊ सोहेल खानचा मुलगा निर्वाण खानही दिसत आहे.

दुसऱ्या फोटोमध्ये सलमानचे चाहते रशियात त्याच्यासोबत सेल्फी घेत आहेत. सलमान खानच्या फॅन पेजनुसार, अभिनेता यावेळी कारचा पाठलाग करणारा सीन शूट करत होता. सलमानचा लूक पाहून चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस

एका चाहत्याने या फोटोंवर कमेंट करत लिहिलं – भाईजान काय दिसताय… दुसरीकडे, आणखी एका चाहत्यानं लिहिलं – 2022 ईदला धमाका होणार असं दिसतंय.

मुंबईत चित्रपटाच्या काही भागाचं चित्रीकरण केल्यानंतर सलमान आणि कतरिना रुसला गेले आहेत. यानंतर या चित्रपटाचं चित्रीकरण ऑस्ट्रेलिया आणि तुर्कीमध्ये केलं जाईल. अहवालांवर विश्वास ठेवल्यास, इम्रान हाश्मी तुर्कीच्या वेळापत्रकातून चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे.

टायगर 3 हा 2022 मध्ये रिलीज होईल. हा 2022 मधील सर्वात मोठा बॉलिवूड चित्रपट असणार आहे. टायगर फ्रँचायझीमधील हा तिसरा चित्रपट आहे. पहिला चित्रपट ‘एक था टायगर’, दुसरा ‘टायगर जिंदा है’ आणि तिसरा ‘टायगर 3’ असेल. चित्रपटाचा पहिला भाग कबीर खान यांनी दिग्दर्शित केला होता आणि दुसरा भाग अली अब्बास जफर यांनी.

संबंधित बातम्या

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.