Radhe vs SMJ 2 | सलमान विरुद्ध जॉन अब्राहम ‘सामना, कोण मारणार बाजी?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटगृहे 50 टक्के क्षमतेने उघडे आहेत. आणि आता यामध्येच दोन मोठे चित्रपट एकाच दिवशी रिलीज होण्याची शक्यता आहे.

Radhe vs SMJ 2 | सलमान विरुद्ध जॉन अब्राहम 'सामना, कोण मारणार बाजी?
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 9:26 AM

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटगृहे 50 टक्के क्षमतेने उघडे आहेत. आणि आता यामध्येच दोन मोठे चित्रपट एकाच दिवशी रिलीज होण्याची शक्यता आहे. सलमान खानचा (Salman Khan) ‘राधे’ आणि जॉन अब्राहमचा (John Abraham) ‘सत्यमेव जयते 2’ असे दोन मोठे चित्रपट ईदला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सलमानच्या ‘राधे’ चित्रपटाची रिलीजची तारीख अद्याप जाहीर झालेली नसली तरी मे महिन्यात ईदच्या निमित्ताने हा चित्रपट रिलीज होणार असल्याची माहिती आहे. (Salman Khan’s Radhe and John Abraham Satyameva Jayate 2 will be released on the same day)

जॉन अब्राहम (John Abraham) लवकरच सत्यमेव जयते 2 (Satyameva Jayate 2) या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहात आहेत. आता चित्रपटाच्या रिलीजचा तारीख देखील पुढे आली आहे. जॉन अब्राहमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट ईदच्या निमित्ताने 14 मे रोजी रिलीज होईल.

चित्रपटाच्या रिलीजची तारीख प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जाहिर करण्यात आली होती. जॉन अब्राहमने हातात देशाचा झेंडा पकडत पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातलेला फोटो शेअर करत लिहिले होते की, तन मन धन पेक्षा महत्वाचे जण गण मन, सत्यमेव जयते 2 च्या टिमकडून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! 14 मे ला ईदच्या दिवशी भेटूयात सत्यमेव जयते 2 मिलाप झवेरी दिग्दर्शित या चित्रपटात मनोज बाजपेयी यांच्यासह अनेक स्टार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसतील.

2018 मध्ये ‘सत्यमेव जयते’ हा चित्रपट रिलीज झाला होता. त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळाला होता. या चित्रपटात दिव्या खोसला कुमार देखील दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी दिव्याने काही फोटो जॉनबरोबर तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले होते. या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाची साडी घातलेली दिसत होती. जॉन अब्राहमने काही दिवसांपूर्वी सत्यमेव जयते 2 चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते.

संबंधित बातम्या : 

वरुण धवनपाठोपाठ त्याची ‘डान्सर’ को-स्टारही विवाहबंधनात अडकणार?

‘गुम हैं किसी के प्यार में’ मालिकेतील नील ऐश्वर्याचं जमलं!, रोका सेरेमनीचे खास फोटो शेअर

(Salman Khan’s Radhe and John Abraham Satyameva Jayate 2 will be released on the same day)

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.