सलमान खानच्या शुटिंगच्या ठिकाणी आला, हटकताच म्हणाला, बिश्नोई को बोलूं क्या…?; सेटवर एकच खळबळ

सलमान खानच्या शूटिंग सेटवर संदिग्ध व्यक्ती आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे आणि चौकशी सुरू आहे. पूर्वीही सलमान खानला धमक्या मिळाल्या आहेत, त्यांच्या घरावर गोळीबार झाला आहे आणि जवळचे मित्र बाबा सिद्दीकींची हत्या झाली आहे. या सर्व घटनांमुळे त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था अधिक कडक करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सलमान खानच्या शुटिंगच्या ठिकाणी आला, हटकताच म्हणाला, बिश्नोई को बोलूं क्या…?; सेटवर एकच खळबळ
salman khanImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 04, 2024 | 11:51 PM

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याच्या सुरक्षेवर गंभीर चिंता व्यक्त करण्यात येत असतानाच आज आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. एक संदिग्ध व्यक्ती अचानक सलमान खानच्या शुटिंगच्या ठिकाणी आला. ही व्यक्ती अनोळखी वाटल्याने त्याला हटकण्यात आलं. त्यावर त्याने थेट बिश्नोई को बोलूं क्या…? असं उत्तर दिलं. त्यामुळे सेटवर एकच खळबळ उडाली. या व्यक्तीला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. पण सलमान खानच्या सुरक्षा व्यवस्थेत वारंवार चूक राहत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

सलमान खानच्या सुरक्षेचा मुद्दा प्रचंड हायलाइट झाला आहे. गँगस्टर बिश्नोईकडून सलमानला अनेकदा धमक्या मिळाल्या आहेत. सलमानला अनेकदा धमक्यांचे फोन गेले आहेत. त्याला धमक्यांचे मेसेजही करण्यात आले आहे. त्यामुळे सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. सलमानला लॉरेन्स बिश्नोईकडून गेल्या अनेक वर्षापासून धमकी मिळत आहे. मागे तर सलमानच्या घराबाहेर गोळीबारही करण्यात आला. तर सलमान खानचे अत्यंत जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांची हत्याही बिश्नोई गँगने केली. बाबा सिद्दीकी सलमानच्या अत्यंत जवळचे होते म्हणून त्याची हत्या करण्यात आल्याचं उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

तो व्यक्ती कोण?

दादर पश्चिमेला सलमानच्या सिनेमाची शुटिंग सुरू होती. यावेळी सलमानच्या एका फॅनला शुटिंग पाहायची होती. पण सुरक्षा रक्षकांनी त्याला सोडलं नाही. त्याच्यासोबत धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे या व्यक्तीचा सुरक्षा रक्षकांशी झगडा झाला. या रागाच्या भरात या व्यक्तीने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचं नाव घेतलं. त्यामुळे या सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना बोलावं त्याला पोलिसांच्या हवाली केलं. शिवाजी पार्क पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी करत आहेत.

14 एप्रिलला घराच्या बाहेर फायरिंग

सलमानच नाही तर बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना बिश्नोई गँगकडून धमक्या मिळाल्या आहेत. तसेच धमकीचे मेसेजही गेले आहेत. त्यामुळे अनेक कलाकारांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 12 ऑक्टोबर 2024 रोजी बाबा सिद्दीकींची हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी हे सलमानचे अत्यंत जवळचे मित्र होते. बाबा सिद्दीकी यांच्या निधनाने सलमानला धक्का बसला होता. त्यापूर्वी 14 एप्रिल रोजी सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. तर पनवेलमधील फार्महाऊसमध्ये घुसण्याचा एकाने प्रयत्न केल्याचंही उघड झालं होतं. त्यामुळे सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.