Salman Khan | तो फोटो व्हायरल होताच सलमान खान याचे सर्वत्र काैतुक, चाहते म्हणाले…
गेल्या कित्येक दिवसांपासून त्याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर गेल्या काही दिवसांपासून धमाका करू शकत नाहीत. याला फक्त पठाण चित्रपट अपवाद ठरलाय.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याचा किसी का भाई किसी की जान हा चित्रपट यंदा एप्रिलमध्ये ईदच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील एक गाणे अगोदरच रिलीज करण्यात आलंय. हे गाणे पाहून चाहत्यांमधील उत्साह वाढल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे नय्यो लगदा या गाण्याला चाहत्यांनी प्रचंड प्रेम दिले आहे. पठाण या चित्रपटामध्ये सलमान खान याची झलक देखील बघायला मिळाली होती. सलमान खान याचे चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून त्याच्या किसी का भाई किसी की जान (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर गेल्या काही दिवसांपासून धमाका करू शकत नाहीत. याला फक्त पठाण चित्रपट अपवाद ठरलाय.
किसी का भाई किसी की जान या चित्रपटामुळे चर्चेत असतानाच एक फोटोमुळेही आता सलमान खान हा चर्चेत आलाय. या फोटोमध्ये सलमान खान याच्यासोबतच अरबाज खान देखील दिसत आहे. सलमान खान याचा हा फोटो पाहून त्याचे चाहते त्याच्यावर फिदा झाले आहे. हा फोटो सलमान खान याच्या घरातील आहे.
सर्वात अगोदर वीरल भियानी याने हा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये सलमान खान हा जेवताना दिसत आहे. विशेष म्हणजे सलमान खान हा आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत जेवण करत असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे. आता हाच फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
फोटोमध्ये सलमान खान हा शांतपणे जेवताना दिसत आहे. फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करतायत. एका चाहत्याने लिहिले की, सलमान खान हा घरी देखील एखाद्या 5 स्टार हाॅटेलसारखे जेवण करतो हे विशेष आहे. एकाने लिहिले की, असे कुटुंबासोबत मिळून जेवण्यासाठी देखील नशीब लागते.
दुसऱ्याने या फोटोवर कमेंट करत म्हटले की, आज मी सलमान खान याला मानले…इतका मोठा स्टार असूनही तो आजही आपल्या आई वडिलांसोबत राहतो हे विशेष आहे. तिसऱ्याने लिहिले की, टेबलवरील सर्व पदार्थ पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटले आहे. सलमान खान याच्या या फोटोवर मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
केआरके याने सलमान खान याच्यावर मोठा आरोप केला असून केआरके याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटले होते की, सलमान खान हा त्याच्या आगामी चित्रपटाची 100 कोटींचे तिकिटे खरेदी करणार आहे. चित्रपट फ्लाॅप जाऊ नये, याकरिता.