लग्न सलमानचं, काळजी महेश मांजरेकरांना! म्हणतायत ‘तो आतून एकटा पडलाय, त्याला…’

अभिनेता सलमान खान (Salman Khan) लग्न कधी करणार? या प्रश्नाचे उत्तर अभिनेत्याच्या कुटुंबियांनाच नाही तर, त्याचे चाहते आणि मित्रांनाही जाणून घ्यायचे आहे. आता त्याचा मित्र आणि को-स्टार महेश मांजरेकरनेही सलमान आणि त्याच्या लग्नावर भाष्य केले आहे.

लग्न सलमानचं, काळजी महेश मांजरेकरांना! म्हणतायत ‘तो आतून एकटा पडलाय, त्याला...’
Salman-Mahesh
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 11:26 AM

मुंबई : अभिनेता सलमान खान (Salman Khan) लग्न कधी करणार? या प्रश्नाचे उत्तर अभिनेत्याच्या कुटुंबियांनाच नाही तर, त्याचे चाहते आणि मित्रांनाही जाणून घ्यायचे आहे. आता त्याचा मित्र आणि को-स्टार महेश मांजरेकरनेही सलमान आणि त्याच्या लग्नावर भाष्य केले आहे. महेश मांजरेकरांना वाटते की, सलमानचे लाखो चाहते असले तरी प्रत्यक्षात सलमान खान एकटाच आहे. सलमानचे अजून लग्न झालेले नाही ही त्याची देखील अडचण आहे.

महेश मांजरेकर यांनी सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत याविषयी सांगितले होते की, ‘कधीकधी असे होते की, जे इतर लोक करू शकत नाहीत त्याबद्दल मी त्याच्याशी बोलतो. मी सलमानला सांगितले की, तू लग्न करत नाहीयस, मला त्यात अडचण आहे. तू लग्न करावं अशी माझी इच्छा आहे. मला उद्या सलमानच्या मुलाला बघायचे आहे. अर्ध्याहून अधिक वेळा तो माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो, पण मला असे वाटते की त्याला सोबतीला आता कोणीतरी हवे आहे.’

एक बेडरूम फ्लॅटमध्ये राहतो!

‘कधी कधी असं वाटतं की, तो बाहेरून जितका आनंदी दिसतो तितकाच तो आतून एकटं वाटतो. तुम्ही पाहिले असेलच की सलमान जिथे राहतो तो एक बेडरूमचा फ्लॅट आहे. मी जेव्हाही त्याच्या घरी जातो तेव्हा अर्ध्याहून अधिक वेळा तो मला ड्रॉईंग रूममध्ये सोफ्यावर पडलेला दिसतो. मला वाटते की, या माणसाला खूप यश मिळाले आहे. तो एक यशस्वी माणूस आहे, पण त्याच्या मागे असलेला माणूस काही सामान्य मध्यमवर्गीय माणूसच आहे.’

महेश पुढे म्हणाला, ‘कधीकधी असं वाटतं की सलमानला अशी कोणाची तरी गरज आहे, जिच्यासोबत तो आयुष्यात नव्याने जगू शकेल. कारण सलमानसोबत असलेले प्रत्येकजण, त्याचे मित्र, ते सगळे चांगले मित्र आहेत. सगळ्यांनाच सलमान आवडतो. मात्र ते नेहमीच सलमानसोबत राहू शकत नाही. त्यांना परत जावे लागेल. पण सलमानने कोणासोबत जायचे?’

अनेकींशी जोडले नाव!

आता महेशच्या या गोष्टी ऐकल्यानंतर सलमानने लवकरात लवकर लग्न करावे असे त्याला वाटते. तसे, सलमानचे नाव अनेक महिलांसोबत जोडले गेले आहे, परंतु हे प्रकरण केवळ नातेसंबंधापर्यंतच राहिले. शेवटचे सलमानचे नाव युलिया वंतूरशी जोडले गेले आहे. दोघे एकत्र पार्टीत जातात. ती सलमानच्या घरीही नेहमी दिसते. मात्र लग्नाबाबत विचारले असता सलमान या प्रश्नाकडे नेहमीच दुर्लक्ष करतो.

सलमानचे प्रोफेशनल लाईफ

सलमानच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले, तर तो आता ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत आयुष शर्मा मुख्य भूमिकेत आहे. सलमानचा मित्र महेश मांजरेकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटात सलमान पोलिसाच्या भूमिकेत आहे, तर आयुष शर्मा खलनायकाच्या भूमिकेत आहे. मोठ्या पडद्यावर या दोघांची स्पर्धा पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.

हेही वाचा :

Zee Marathi Awards 2021 : ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ आणि ‘माझी तुझी रेशीमगाठ’ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!

Padma Shri Awards | एकता कपूर, करण जोहर आणि कंगना रनौत ‘या’ दिवशी स्वीकारणार पद्मश्री पुरस्कार!

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.