Samantha Akkineni : लग्नापूर्वी ‘या’ अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती समांथा अक्किनेनी, चित्रपटाच्या सेटवर झाली होती भेट

समांथा आणि नागा चैतन्य यांचं लग्न मोठ्या उत्साहात झालं. मात्र आज आम्ही तुम्हाला समांथाच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अशी एक गोष्ट सांगणार आहोत जी तिच्या चाहत्यांना कदाचित माहिती नसेल. लग्नाआधी समांथा दाक्षिणात्य अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती मात्र काही कारणांमुळे या दोघांचं ब्रेकअप झालं. (Samantha Akkineni was in a relationship with this actor before marriage, met on the set of the film)

Samantha Akkineni : लग्नापूर्वी 'या' अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती समांथा अक्किनेनी, चित्रपटाच्या सेटवर झाली होती भेट
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 8:37 AM

 मुंबई : साऊथची सुपरस्टार समांथा अक्किनेनी (Samantha Akkineni) सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. नुकतंच तिनं ‘द फॅमिली मॅन 2’ या  वेबसिरीजसह एक नवीन सुरुवात केली. समांथानं 2017 मध्ये टॉलीवूड सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यशी लग्न केलं. मात्र या लग्नाआधी समांथा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरीच चर्चेत होती.

समांथा आणि नागा चैतन्य यांचं लग्न मोठ्या उत्साहात झालं. मात्र आज आम्ही तुम्हाला समांथाच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अशी एक गोष्ट सांगणार आहोत जी तिच्या चाहत्यांना कदाचित माहिती नसेल. लग्नाआधी समांथा दाक्षिणात्य अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती मात्र काही कारणांमुळे या दोघांचं ब्रेकअप झालं.

दक्षिण स्टार सिद्धार्थ सोबतच नातं!

एक काळ असा होता की, तिच्या हृदयात नागा चैतन्य नसून एक अभिनेता राज्य करत होता. आम्ही बोलत आहोत दक्षिणचा स्टार सिद्धार्थबद्दल. समांथा सिद्धार्थच्या प्रेमात होती ते दोघं लग्न करणार होते. असं म्हणतात की, श्रुती हसनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थचे हृदय समांथा अक्किनेनीवर आलं.

दोघांची पहिली भेट

बॉलिवूड लाइफच्या वृत्तानुसार समांथा आणि सिद्धार्थची भेट पहिल्यांदा जबरदश्ट या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. तेव्हा दोघंही मित्र बनले आणि नंतर एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर दोघांनाही अनेकदा स्पॉट करण्यात आलं.

Samantha Akkineni

समांथा आणि सिद्धार्थच्या प्रेमाची चर्चा सर्वत्र होत होती, मात्र या दोघांनी स्वत: कधीही त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला नाही. असं म्हणतात की एका कार्यक्रमात सिद्धार्थनं डान्स परफॉरमेंस अप्रत्यक्षपणे अभिनेत्री समांथासाठी केला होता. त्यामुळे तिला मोठा धक्का बसला होता.

लिव्ह-इन रिलेशनशिप

मिळालेल्या माहितीनुसार, दोघंही एकमेकांच्या इतके प्रेमात होते की ते लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांचं नातं जवळपास अडीच वर्षे चाललं.

सिद्धार्थपासून विभक्त होण्याचा निर्णय समांथाचा !

असं म्हणतात की सिद्धार्थपासून विभक्त होण्याचा निर्णय हा समांथाचा होता. झूमच्या बातमीनुसार, सिद्धार्थला समांथाच्या काही गोष्टी आवडत नव्हत्या, तिच्या मैत्रीपूर्ण स्वभावाबद्दल आणि तिनं ज्या प्रकारचे कपडे घातले त्यावरही सिद्धार्थ आक्षेप घेत होता. असं म्हटलं जातं की त्याला समांथाला स्वतःच्या आवडी प्रमाणे ठेवायचं होतं, म्हणूनच ते दोघे वेगळे झाले.

संबंधित बातम्या

Photo : कियारा आडवाणी सारख्या दिसणाऱ्या ‘या’ व्यक्तीची सोशल मीडियावर चर्चा

Ankita Lokhande : सुशांतच्या पुण्यतिथीच्या एक दिवस आधी अंकिता लोखंडेनं शेअर केला खास फोटो, लिहिलं ‘अंतरानं काही फरक पडत नाही कारण …’

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.