Oo Antava : समंतानं रिजेक्ट केलं होतं गाणं, कुणी आणि कशी काढली तिची समजूत?
पुष्पा (Pushpa) चित्रपटासह 'ओ अंतावा' (Oo Antava) या आयटम साँगचीही जोरदार चर्चा आहे. एकीकडे लोक त्याला प्रचंड लाइक करतायत. या गाण्याबाबत चित्रपटाच्या दिग्दर्शक सुकुमार (Director Sukumar) यांनी मोठा खुलासा केलाय.
मुंबई : अल्लू अर्जुन(Allu Arjun)चा ‘पुष्पा’ (Pushpa The Rise) चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झालाय. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षकांमध्ये याची मोठी क्रेझ होती. अल्लू अर्जुनच्या जबरदस्त अॅक्शन सीन्समुळे यात आणखी भर पडलीय. यासोबतच या चित्रपटातल्या समंताच्या ‘ओ अंतावा’ (Oo Antava) या आयटम साँगचीही जोरदार चर्चा आहे. एकीकडे लोक त्याला प्रचंड लाइक करतायत. या गाण्याबाबत चित्रपटाच्या दिग्दर्शक सुकुमार (Director Sukumar) यांनी मोठा खुलासा केलाय.
काढली समजूत जेव्हापासून ‘पुष्पा’मधल्या समंताच्या ‘ओ अंतावा’ या आयटम साँगची चर्चा सुरू झाली, तेव्हापासून समंतानं आयटम साँग का केलं यावर वाद सुरू झाला. समंतानं पहिल्यांदाच आयटम साँग केलं. यावर दिग्दर्शक सुकुमार यांनी मोठा खुलासा केलाय. त्यांनी सांगितलं, की सुरुवातीला समंतानं हे आयटम साँग करण्यास नकार दिला होता. यात आपल्याला आवड नसल्याचं ती म्हणाली होती. पण सुकुमार यांनी तिची समजूत काढली. ‘रंगस्थलम’मधलं पूजा हेगडेच्या डान्सचं त्यांनी तिला उदाहरण दिलं.
शेअर केला व्हिडिओ आता हे गाणं चाहत्यांनी डोक्यावर घेतलंय. त्याला तुफान लाइक्स मिळतायत. नुकतीच समंतानं इन्स्टाग्रामवर यासंबंधीचे काही व्हिडिओ टाकले होते. ज्यामध्ये प्रेक्षक थिएटरमध्ये तिच्या गाण्यावर नाचताना दिसले. त्यांच्या या गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला.
आयटम साँगच्या शब्दांवरून वाद या आयटम साँगच्या शब्दांवरूनही बराच वाद झाला. यानुसार पुरुषांना वासनेनं भरलेलं दाखवलंय. अल्लू अर्जुनला एका कार्यक्रमात याबाबत विचारण्यात आलं, तेव्हाही अल्लू अर्जुन हसला आणि म्हणाला की हे खरं आहे, या गाण्यात जे काही लिहिलंय. पुष्पाचं संगीत देवी श्री प्रसाद यांनी दिलं असून ‘ओ अंतावा’ या गाण्याचे बोल अनुक्रमे तेलुगू आणि तमिळमध्ये चंद्रबोस आणि विवेक यांनी लिहिले आहेत. हा चित्रपट 17 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.