‘रोमान्स किंग’ शाहरुख खानसोबत चित्रपटात काम करण्यास समंथाचा नकार? जाणून घ्या नेमकं कारण…

साऊथची क्वीन समंथा (Samanatha Ruth Prabhu) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिने अलीकडेच तिचा पती नागा चैतन्यसोबत विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आता समंथा तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. ती स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी खूप काम करत आहे.

‘रोमान्स किंग’ शाहरुख खानसोबत चित्रपटात काम करण्यास समंथाचा नकार? जाणून घ्या नेमकं कारण...
Samantha-Shahrukh khan
Follow us
| Updated on: Oct 19, 2021 | 2:32 PM

मुंबई : साऊथची क्वीन समंथा (Samanatha Ruth Prabhu) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिने अलीकडेच तिचा पती नागा चैतन्यसोबत विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आता समंथा तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. ती स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी खूप काम करत आहे. मात्र, आता अहवालांवर विश्वास ठेवला तर, सामंथाने शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) काम करण्यास चक्क नकार दिला आहे.

अहवालांवर विश्वास ठेवला तर, अभिनेता शाहरुख खान सध्या दिग्दर्शक अटलीच्या अॅक्शन चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटासाठी समंथाला संपर्क करण्यात आला होता. या चित्रपटाला अद्याप कोणतेही अधिकृत नाव देण्यात आलेले नाही. आता त्याचे नाव ‘लायन’ असल्याचे बोलले जात आहे.

यामुळे दिला नकार

शाहरुख खानसोबत काम करण्यासाठी समंथाला संपर्क साधण्यात आला होता. पण, तिने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. कारण ती नागा चैतन्य सोबत कुटुंब पुढे नेण्याचा विचार करत होती. त्यानंतर नयनताराला या चित्रपटासाठी संपर्क साधण्यात आला आणि तिने लगेचच हो म्हटले. नयनतारा यांनी या चित्रपटाचे शूटिंगही सुरू केले आहे. ती सध्या शाहरुख खानशिवाय मुंबईत चित्रपटाचे शूटिंग करत आहे. शाहरुख आणि नयनतारा जेव्हा पुण्यात चित्रपटाचे शूटिंग करत होते, तेव्हा सेटवरून दोघांचे फोटो व्हायरल झाले होते. शाहरुख आणि नयनतारा यांना एकत्र पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे.

अटलीबरोबर केलेय काम

साऊथ दिग्दर्शक अटली आणि समंथा यांच्यात चांगला संबंध आहे. तिने त्याच्यासोबत दोन चित्रपटांमध्ये काम केले आहे. अटली दिग्दर्शित चित्रपट ‘थेरी’ आणि ‘मेरसाल’मध्ये समंथा मुख्य भूमिकेत दिसली होती.

बॉलिवूडमध्ये पदार्पणाच्या तयारीत समंथा

दक्षिणेत धमाका केल्यानंतर समंथाने डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाऊल टाकले आहे. ती वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन 2’मध्ये दिसली होती. तिचा अभिनय चांगलाच पसंत केला गेला. आता ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अहवालांवर विश्वास ठेवला तर, समंथा लवकरच तिच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटाची घोषणा करणार आहे. ती आजकाल तिच्या फिटनेसकडे खूप लक्ष देत आहे. नुकताच तिने वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री कठीण वर्कआउट करताना दिसली होती. व्हिडीओमध्ये अभिनेत्री 30 किलो दुप्पट वजन उचलून स्क्वॅट केले होते.

समंथा कामावर लक्ष केंद्रित करत आहे!

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पती नागा चैतन्यपासून विभक्त झाली आहे. या कठीण काळात स्वतःला कोणत्याही प्रकारच्या तणावापासून दूर ठेवण्यासाठी, ती तिच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते. याशिवाय अभिनेत्रीने एक महिला केंद्रित चित्रपट साईन केला आहे. हा एक स्त्रीभिमुख चित्रपट असेल. मात्र कोणत्याही चित्रपटासंदर्भात अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

हेही वाचा :

Dhamaka Trailer : कार्तिक आर्यनच्या ‘धमाका’चा ट्रेलर रिलीज, चित्रपटात दिसणार सस्पेन्स-थ्रिलरची जादू…

Vamika | अनुष्का शर्माने शेअर केला वामिका-विराटचा क्यूट फोटो, तुम्ही पाहिलात का?

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.