Samantha New Film : दसऱ्याच्या मुहूर्तावर समंथाने स्वीकारला मोठा प्रोजेक्ट, दोन भाषांमध्ये दाखवणार अभिनयाचा जलवा!

लग्नाच्या चार वर्षानंतर समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांनी घटस्फोटाची घोषणा करताच त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर खूप दु:ख व्यक्त केले होते.  या जोडप्याला प्रेमाने ‘चायसॅम’ असेही म्हटले जायचे.

Samantha New Film : दसऱ्याच्या मुहूर्तावर समंथाने स्वीकारला मोठा प्रोजेक्ट, दोन भाषांमध्ये दाखवणार अभिनयाचा जलवा!
Samantha Ruth Prabhu
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 5:13 PM

मुंबई : लग्नाच्या चार वर्षानंतर समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांनी घटस्फोटाची घोषणा करताच त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर खूप दु:ख व्यक्त केले होते.  या जोडप्याला प्रेमाने ‘चायसॅम’ असेही म्हटले जायचे. घटस्फोटानंतर, नागा चैतन्य आजकाल आपल्या आगामी प्रकल्पाचे प्रमोशन करत असताना, समंथाला देखील नवा मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे. जो तिच्या चाहत्यांना खरोखर आनंदी करेल.

घटस्फोटानंतर असे दिसतेय की, आता समंथाने आपले करिअर पूर्णपणे चमकवण्याचे मन बनवले आहे, त्यानंतरच अभिनेत्री पुन्हा कामावर परतली आहे. समंथा यांनी बिग प्रॉडक्शन होम ड्रीम वॉरियर पिक्चर्सच्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये एंट्री केली आहे आणि प्रॉडक्शन हाऊसनेच सोशल मीडियावर समंथाचा फोटो शेअर करून ही घोषणा केली आहे.

दोन भाषांत प्रदर्शित होणार चित्रपट

अभिनेत्री समंथाला या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट तामिळ आणि तेलुगू या दोन भाषांमध्ये बनणार आहे. शांतरुबन ज्ञानसेकरन या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. एसआर प्रकाश बाबू आणि एसआर प्रभू संयुक्तपणे या मोठ्या प्रकल्पाची निर्मिती करणार असल्याची बातमी आहे. चित्रपटाचे शीर्षक आणि उर्वरित स्टारकास्टबाबत कोणतीही घोषणा किंवा माहिती समोर आलेली नाही, पण समंथा लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे.

स्त्री केंद्रित असेल हा चित्रपट

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चित्रपट स्त्रीभिमुख असणार आहे. यात समंथा मुख्य भूमिका साकारणार आहे. ज्यासाठी समंथा खूप उत्साहित असल्याचे सांगितले जाते. निर्मात्यांनीही समंथा ‘हो’ म्हणताच चित्रपटाचे प्री-प्रोडक्शन काम सुरू केले आहे.

त्याचबरोबर, सामंथाने तिच्या उर्वरित चित्रपटांची शूटिंग नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे वचन दिले आहे. त्यानंतर असे म्हटले जात आहे की, या चित्रपटाचे शूटिंग नोव्हेंबरमध्ये सुरू होईल. चित्रपट आणि इतर सर्व काही या संदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे.

उदास दिसली समंथा

अलीकडेच, समंथा रूथ प्रभू पहिल्यांदा सार्वजनिक ठिकाणी दिसली होती. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या फोटोत अभिनेत्री समंथा रूथ प्रभूच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्टपणे दिसत होते. हे फोटो एका पाळीव प्राण्यांच्या दवाखान्याबाहेरचे आहे. जिथे अभिनेत्री तिच्या डॉगी हॅशसह नियमित तपासणीसाठी पोहोचली होती. यादरम्यान तिच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्टपणे दिसत होते. हा फोटो पाहिल्यानंतर अभिनेत्रीच्या चाहत्यांमध्ये चिंतेची लाट उसळली होती. अभिनेत्री समंथा रूथ प्रभू यांनी कौन बनेगी करोडपतीच्या तेलुगु आवृत्तीत सहभागी होणार आहे.

समंथाने अलीकडेच तिच्या आगामी ‘शकुंतलम’ या चित्रपटासाठी डबिंग सुरू केले आहे. गुणशेखर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. त्याचबरोबर, समंथा आता बॉलिवूडमध्ये पाऊल टाकण्याची जोरदार तयारी करत आहे.

हेही वाचा :

‘सरदार उधम’च्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचले बॉलिवूड स्टार्स, कतरिनापासून सिद्धार्थपर्यंत कलाकारांचा जलवा

ऋतुराज गायकवाडची दमदार खेळी, मैदानीतील धुव्वेबाजी पाहून चाहत्यांना आली मराठी अभिनेत्रीची आठवण!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.