घटस्फोटानंतर समंथाने पूर्ण केलं स्वतःचं स्वप्न, ‘सेल्फ टाईम’ला महत्त्व देत अभिनेत्री करतेय पुढे जाण्याचा प्रयत्न!

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा प्रभू (Samantha Ruth Prabhu) आजकाल सतत चर्चेचा एक भाग बनली आहे. नागा चैतन्यापासून विभक्त झाल्यानंतर समंथा स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. समंथा या दिवसात चार धाम यात्रेला गेली होती, जी आता नुकतीच संपली आहे.

घटस्फोटानंतर समंथाने पूर्ण केलं स्वतःचं स्वप्न, ‘सेल्फ टाईम’ला महत्त्व देत अभिनेत्री करतेय पुढे जाण्याचा प्रयत्न!
Samantha Ruth Prabhu
Follow us
| Updated on: Oct 23, 2021 | 12:05 PM

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा प्रभू (Samantha Ruth Prabhu) आजकाल सतत चर्चेचा एक भाग बनली आहे. नागा चैतन्यापासून विभक्त झाल्यानंतर समंथा स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. समंथा या दिवसात चार धाम यात्रेला गेली होती, जी आता नुकतीच संपली आहे. तिने बद्रीनाथ मंदिरातील एक फोटो शेअर करून आपल्या सहलीच्या समाप्तीची माहिती दिली आहे.

बद्रीनाथ धामला भेट दिल्यानंतर समंथाने तिचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती शिल्पा रेड्डीसोबत हेलीकॉप्टरजवळ पोज देताना दिसत आहे. तिने तिच्या चार धाम यात्रेचा अनुभव शेअर केला आहे.

हिमालयात जायचे स्वप्न होते!

फोटो शेअर करताना समंथा प्रभूने लिहिले की, ‘विलक्षण प्रवास संपला. चारधाम यात्रा, यमनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ. महाभारत वाचल्यापासून मला हिमालयाबद्दल आकर्षण वाटत आहे. पृथ्वीवरील या स्वर्गात जाणे हे माझे एक स्वप्न होते, महान रहस्याचे ठिकाण, देवांचे निवासस्थान.’

सामंथाने पुढे लिहिले की, ‘मला जे वाटले तेच होते. शांत आणि भव्य.. मिथक आणि वास्तव यांच्यातील गुंतागुंतीचा गोंधळ. हिमालयाला माझ्या हृदयात एक विशेष स्थान असेल आणि ते आणखी खास आहे, कारण मला ते तुमच्यासोबत अनुभवण्याची संधी मिळाली आहे.’

पाहा पोस्ट :

कंगना रनौतने दिली प्रतिक्रिया

समांथाच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे कंगना रनौत. कंगनाने समंथाच्या पोस्टवर लिहिले, ‘व्वा…’ तसेच हृदयाचे इमोजी पोस्ट केले. तिची ही पोस्ट 11 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केली आहे. समंथाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना या सहलीची झलक दाखवली आहे.

दोन मोठ्या चित्रपटांवर सायनिंग

समंथा सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रित करत आहे. तिने दोन मोठे चित्रपट साईन केले आहेत. प्रॉडक्शन हाऊसनेच सोशल मीडियावर समंथाचा फोटो शेअर करून ही घोषणा केली आहे. रिपोर्ट्सनुसार, समंथाचा हा चित्रपट दोन भाषांमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. शांतरुबन ज्ञानसेकरन या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करणार आहेत. या चित्रपटाच्या उर्वरित स्टारकास्टची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, समंथा शेवट वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन 2’मध्ये दिसली होती. या मालिकेतील तिचा अभिनय सर्वांनाच आवडला होता. आता चाहते तिच्या बॉलिवूड पदार्पणाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

हेही वाचा :

तब्बल 26 वर्षानंतर ‘DDLJ’ एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार, आदित्य चोप्रा करणार संगीतमय पदार्पण!

Drugs Case | आर्यनला ड्रग्ज पुरवले, पण कोणत्याही पेडलरच्या संपर्कात नाही! अनन्या पांडेची NCB समोर कबुली

Happy Birthday Prabhas | पॅन इंडिया स्टार प्रभास, अभिनेत्याला प्रेमाने ‘डार्लिंग’ का म्हणतात? तुम्हाला माहितेय का?

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.