Samantha Ruth Prabhu | ‘घटस्फोटानंतर नागा चैतन्यचे 50 कोटी लुटून बसलीये..’, चाहत्याच्या आरोपावर पाहा काय म्हणाली समंथा…

साउथ क्वीन अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही पती नागा चैतन्यपासून (Naga Chaitanya) घटस्फोट घेतल्यापासून ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी असाही दावा केला आहे की, समंथाने केवळ पैशासाठी नागाशी लग्न केले आणि चार वर्षांनी घटस्फोट घेतला.

Samantha Ruth Prabhu | ‘घटस्फोटानंतर नागा चैतन्यचे 50 कोटी लुटून बसलीये..’, चाहत्याच्या आरोपावर पाहा काय म्हणाली समंथा...
Naga-Samantha
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 11:17 AM

मुंबई : साउथ क्वीन अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही पती नागा चैतन्यपासून (Naga Chaitanya) घटस्फोट घेतल्यापासून ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी असाही दावा केला आहे की, समंथाने केवळ पैशासाठी नागाशी लग्न केले आणि चार वर्षांनी घटस्फोट घेतला. अलीकडेच, त्यांच्या घटस्फोटासाठी समांथाला जबाबदार धरून तिला ट्रोल करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करण्यात आला. मात्र, यावेळीही समांथाने या ट्रोल करणाऱ्या व्यक्तीची बोलतीच बंद केली असून, अत्यंत चोख आणि नेमके उत्तर दिले आहे.

समंथाला ट्रोल करताना एका युजरने लिहिले की, ‘समंथा घटस्फोटित, उद्ध्वस्त आणि सेकेंड हँड आयटम आहे, जी नागा चैतन्यच्या करमुक्त 50 कोटीं लुटून बसली आहे’. यावर समंथाने युजरला उत्तर देताना लिहिले की, ‘देव तुमच्या आत्म्याला आशीर्वाद देवो’ म्हणजेच ‘देव तुमचे रक्षण करो.’ समंथाच्या या उत्तराचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. यानंतर मात्र, युजरने त्याचे ट्विट डिलीट केले आहे.

मी इतकी कणखर आहे, हे माहितच नव्हते!

मात्र, मागील काही काळ समंथासाठी खूप अडचणींनी भरलेला आहे. तिने अलीकडेच सांगितले की, नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्यानंतर तिला असे वाटले होते की, तीचे आयुष्य आता संपेल. समंथा म्हणाली की, ‘मी किती मजबूत आहे हे जाणून मलाच आश्चर्य वाटले. मला वाटलं मी खूप कमकुवत व्यक्ती आहे. मला वाटले की, विभक्त होऊन मी कोलमडून जाईन. मला कधीच असे वाटले नाही की, मी इतकी कणखर असेन. आज मी इतकी कणखर आहे, याचा मला अभिमान वाटतो कारण ही मीच आहे हे मला कधी माहीतच नव्हते.’

पतीपासून विभक्त झाल्यानंतर सामंथाने सोशल मीडियावर तिच्याविरोधात चुकीच्या गोष्टी लिहिणाऱ्यांवर टीकाही केली होती. ती म्हणाली होती की, ‘जेव्हा महिलांचा प्रश्न असतो, तेव्हा त्यावर नैतिकतेचे प्रश्न उपस्थित केले जातात, पण समाज म्हणून आपण पुरुषांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह का उपस्थित करत नाही?’

चार वर्षांपूर्वी बांधली होती लग्नगाठ

2017मध्ये समंथा आणि चैतन्यचे थाटामाटात लग्न झाले होते. अलीकडेच दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर करून 4 वर्ष जुने नाते तुटल्याची बातमी दिली. दोघांच्या या निर्णयाने चाहते आश्चर्यचकित झाले होते.

हेही वाचा :

Money Laundering Case : बॉलिवूड सेलिब्रिटींनी तुरुंगात जाऊनही घेतली सुकेश चंद्रशेखरची भेट, अनेक सेलिब्रिटी गोत्यात येणार!

Aishwarya Rai Bachchan | ‘बच्चन’ परिवार अडचणीत, ऐश्वर्या रायला ‘ईडी’चे समन्स! नेमकं प्रकरण काय?

Kajal Aggarwal | ‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवालकडे ‘गुड न्यूज’? नव्या फोटोंमुळे चर्चेला उधाण!

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.