Samantha Ruth Prabhu | ‘आता पुन्हा पुन्हा तेच तेच किती वेळा?’, नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटावर समंथाचं मोठ भाष्य!

साऊथचं सुपरकपल नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आता एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. सरत्या वर्षात दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना याची माहिती दिली होती.

Samantha Ruth Prabhu | ‘आता पुन्हा पुन्हा तेच तेच किती वेळा?’, नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटावर समंथाचं मोठ भाष्य!
Naga Chaitanya-Samntha Prabhu
Follow us
| Updated on: Dec 11, 2021 | 11:19 AM

मुंबई : साऊथचं सुपरकपल नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आता एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. सरत्या वर्षात दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना याची माहिती दिली होती. समंथा आणि नागा यांच्या विभक्त झाल्याची बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्काच बसला होता. नागापासून वेगळे झाल्यानंतर समंथा आता तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे.

समंथाने याच वर्षात ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवले आहे. ‘द फॅमिली मॅन 2’ या वेब सीरीजमध्ये त्याने काम केले आहे, ज्यासाठी त्याचे खूप कौतुक होत आहे. या व्यक्तिरेखेसाठी समंथाला नुकताच पुरस्कारही मिळाला आहे. ज्यानंतर ती खूप खुश आहे. दरम्यान तिने घटस्फोटाबद्दलही मोठं भाष्य केलं आहे.

आता पुन्हा पुन्हा तेच तेच किती वेळा?

ETimes शी एका खास संभाषणात, समंथाने नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटाबद्दल वक्तव्य केले आहे. नागा आणि समंथा यांच्या घटस्फोटाची बातमी ऐकून इंडस्ट्रीतील सर्वांनाच धक्का बसला आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी झालेल्या संवादाबाबत बोलताना समंथा म्हणाली की, मला वाटते की मी याबद्दल खूप बोलले आहे. त्याबद्दल बोलणे आवश्यक होते आणि मी खूप बोललेय. पण आता तेच तेच पुन्हा पुन्हा सांगणे आवश्यक आहे, असे मला वाटत नाही.

2022 मध्ये चांगले काम करायचे आहे!

2022 मध्ये समंथा खूप व्यस्त असणार आहे. ती म्हणाली की, मला खूप मेहनत करावी लागते. मी खूप नशीबवान आहे की, मला उत्कृष्ट व्यक्तिरेखा साकारायला मिळाल्या आहेत आणि मला त्यांना न्याय द्यायचा आहे. मी आशा करते आणि प्रार्थना करते की, मला ऑफर केल्या गेलेल्या पात्रांना मी न्याय देऊ शकेन!

समंथाने ‘द फॅमिली मॅन 2’मध्ये ‘राजी’ची भूमिका साकारली आहे. या व्यक्तिरेखेत ती एकदम निडर दिसली होती. त्यामुळे तिचे खूप कौतुक होत आहे. या व्यक्तिरेखेसाठी मिळणाऱ्या कौतुकाबाबत समंथा म्हणाली की, महिलांना अशा व्यक्तिरेखा क्वचितच साकारायला मिळतात ज्यात त्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेऊ शकतील.

‘राजी’च्या भूमिकेसाठी समंथाला फिल्मफेअर ओटीटी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. या मालिकेत तिच्यासोबत मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेत दिसला आहे. सामंथा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे आणि चाहत्यांना तिच्या प्रोफेशनबद्दल सांगत असते.

हेही वाचा :

Ali Akbar : बिपीन रावत यांच्या निधनावर स्माईली इमोजीमुळं दिग्दर्शक अली अकबर भडकला, थेट धर्मांतराची घोषणा, हिंदू नावही जाहीर

Happy Birthday Kimi Katkar | ‘जुम्मा चुम्मा’ गर्ल किमी काटकर, मनोरंजन विश्वात आल्यावर बदलले नाव!

Aarya Season 2 Review | तिसऱ्या सीझनची वाट पाहायला लावणारा ‘आर्या 2’, सुष्मिता सेनच्या धमाकेदार अ‍ॅक्शनने जिंकलं प्रेक्षकांचं मन!

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.