समंथाची पती नागा चैतन्यच्या पोस्टवर खास कमेंट, घटस्फोटाच्या बातम्यांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न?
दक्षिणात्य सिनेमाची प्रसिद्ध अभिनेत्री समंथा अक्किनेनी (Samantha Akkineni) आणि नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्य (Naga Chaitanya) या जोडीचे चाहते जगभरात आहेत. चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या या जोडप्याने 2017 मध्ये लग्न केले.
मुंबई : दक्षिणात्य सिनेमाची प्रसिद्ध अभिनेत्री समंथा अक्किनेनी (Samantha Akkineni) आणि नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्य (Naga Chaitanya) या जोडीचे चाहते जगभरात आहेत. चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या या जोडप्याने 2017 मध्ये लग्न केले. दोघांनाही दक्षिण भारतीय उद्योगातील गोंडस जोडपे मानले जाते. बऱ्याच काळापासून त्यांचे वैवाहिक आयुष्य बिघडल्याच्या बातम्या येत होत्या. पण यादरम्यान, सामंथाने तिच्या पतीच्या पोस्टवर खास कमेंट केली आहे, जी आता चर्चेत आली आहे.
बऱ्याच काळापासून असे वृत्त चर्चेत आहे की, सामंथा आणि नागा चैतन्य यांच्या नात्यात काही कुरबुरी चालू आहेत. लवकरच हे दोघेही वेगळे होऊ शकतात. मात्र, आता सामंथाच्या एका पोस्टने या सर्व बातम्यांना पूर्णविराम दिला आहे.
समंथाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून आडनाव काढून टाकल्यानंतर त्यांच्या विभक्त होण्याच्या अफवा सुरू झाल्या. याबद्दल तिला प्रश्न विचारण्यात आला होता, मात्र अभिनेत्रीने यावर मौन राखण्याचा निर्णय घेतला आहे.
समंथाने पतीच्या पोस्टवर केली कमेंट
दुसरीकडे, चैतन्य देखील संपूर्ण प्रकरणाबद्दल मौन बाळगून आहे. पण या सगळ्या दरम्यान, चैतन्याने त्याच्या आगामी रिलीज असलेल्या ‘लव्ह स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे, ज्यात अभिनेत्री साई पल्लवी देखील आहे. पत्नी समंथा हिने अभिनेत्याच्या याच पोस्टवर कमेंट केली आहे.
अशा परिस्थितीत समंथाने चैतन्यचे ट्विट पुन्हा शेअर केले आणि लिहिले, “विजेता!! टीमला शुभेच्छा @Sai_Pallavi92 .. #LoveStoryTrailer “.
पाहा पोस्ट :
WINNER!! All the very best to the team @Sai_Pallavi92 ?.. #LoveStoryTrailer https://t.co/nt9rzTc3lY
— S (@Samanthaprabhu2) September 13, 2021
फक्त समंथाची ही पोस्ट पाहून चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टमुळे चाहते खूप आनंदी झाले आहेत. अभिनेत्रीच्या पोस्टवरून असे दिसते की, तिच्या पतीबरोबरचे तिचे नातेसंबंध पूर्णपणे ठीक आहेत, ज्या बातम्या येत होत्या त्या केवळ अफवा होत्या.
अभिनयापासून दूर जाणार?
टॉलिवूडची नंबर 1 स्टार सामंथा अक्किनेनी अभिनय विश्वावर वर्षानुवर्षे राज्य करत आहे. साउथ सिने वर्ल्डमध्ये सामंथा अक्किनेनीचे प्रचंड चाहते आहेत. ती बऱ्याच काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. साऊथ सिने स्टार सामंथा अक्किनेनीच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वेब सीरीज ‘द फॅमिली मॅन’ला चाहत्यांचा आणि समीक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
एका मुलाखतीदरम्यान, समंथा म्हणाली की, तिला आता अभिनयापासून काही काळ विश्रांती घ्यायची आहे. तिने सांगितले की, तिच्या 10-11 वर्षांच्या कारकिर्दीत ती सतत काम करत आहे. लग्नानंतरही तिने चित्रपटांमधून ब्रेक घेतला नाही आणि बॅक टू बॅक चित्रपटांमध्ये व्यस्त राहिली. अभिनेत्रीने सांगितले की, आता तिला एक किंवा दोन वर्षांचा ब्रेक घ्यायचा आहे. त्यानंतरच ती पुन्हा चित्रपटात काम सुरू करेल. अर्थातच हा ब्रेक समंथासाठी लहान असेल, पण तिच्या चाहत्यांसाठी हा ब्रेक खूप मोठा असणार आहे. समंथाकडे सध्या दोन तामिळ चित्रपट आहेत. यापैकी एकामध्ये ती विजय सेतुपती आणि नयनतारासोबत दिसणार आहे, तर दुसरा हॉरर थ्रिलर चित्रपट आहे.
हेही वाचा :
Sukh Mhnje Nakki Kay Asta : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत गौराईंचं आगमन, पाहा खास फोटो