KGF 2 | कर्करोगावर मात करून संजय दत्त शूटिंगवर हजर, दमदार अ‍ॅक्शने केली सुरूवात!

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने (Sanjay Dutt) कर्करोगावर मात करून पुन्हा एकदा काम सुरू केले आहे.  त्याने केजीएफ 2 ची तयारी सुरू केली आहे. संजय दत्तच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, संजय दत्तने नुकतेच काम सुरू केले आहे.

KGF 2 | कर्करोगावर मात करून संजय दत्त शूटिंगवर हजर, दमदार अ‍ॅक्शने केली सुरूवात!
sanjay dutt
Follow us
| Updated on: Aug 25, 2021 | 1:47 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने (Sanjay Dutt) कर्करोगावर मात करून पुन्हा एकदा काम सुरू केले आहे.  त्याने केजीएफ 2 ची तयारी सुरू केली आहे. संजय दत्तच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, संजय दत्तने नुकतेच काम सुरू केले आहे. त्याने ‘भुज’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केली आहे आणि सध्या त्याचे हैदराबादमध्ये केजीएफ 2 चे शूटिंग सुरू आहे. (Sanjay Dutt overcomes cancer and attends shooting)

केजीएफच्या निर्मात्यांनी संजय दत्तच्या आरोग्याची स्थिती लक्षात घेत बॉडी डबल घेण्याचे सुचविले होते. मात्र याला संजय दत्तने नकार दिला आणि संजय दत्त स्वत: अ‍ॅक्शन सीक्वेन्स केले. त्याच्या आधीच्या चित्रपटांमध्येही त्याने असेच केले होते. तो आजारातून पूर्णपणे बरा झाला आहे. केजीएफ २ चे शेवटचे आणि अंतिम वेळापत्रक आहे.

शूटिंग डिसेंबरच्या सुरूवातीला सुरू झाली आणि डिसेंबरच्या मध्यापर्यंत पूर्ण होईल. संजय दत्त दररोज शूट करत आहे आणि ब्रेकही घेत नाही. केजीएफचा प्रसिद्ध अभिनेता यश संजय दत्तसोबत ‘केजीएफ २’ मध्ये स्क्रीन स्पेस शेअर करत आहे. बहुप्रतीक्षित चित्रपटात दोन्ही सुपरस्टार पहिल्यांदाचसोबत काम करीत आहेत.

बॉलिवूडचा ‘संजू बाबा’ अर्थात संजय दत्त (Sanjay Dutt) यांने कर्करोगावर  मात केली आहे. काही दिवसांपूर्वी संजय दत्तचे फोटो व्हायरल झाले होते. यात त्याची प्रकृती ढासळलेली दिसल्याने चाहत्यांना धक्का बसला होता. यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात संजय दत्तला कर्करोग झाल्याचे वृत्त समोर आले होते. यानंतर तो उपचारांसाठी अमेरिकेत गेला होता. गेल्या आठवड्यात त्याचा पीटीई रिपोर्ट आला असून, त्यानुसार संजय दत्त कर्करोगातून पूर्णपणे बरा झाला असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात त्याच्या एका जवळच्या व्यक्तीने पीटीआयला ही माहिती दिली होती.

त्यांनी सांगितले की, ‘जेव्हा संजय दत्त आजारी आहे ही बातमी समोर आली तेव्हा सगळ्यानांच शॉक बसला होता. त्यातही त्याला कर्करोग झाल्याने तो आता केवळ सहा महिनेच जगणार असल्याच्या अफवादेखील पसरल्या होत्या. मात्र, या अफवांना बळी न पडता त्याच्या सगळ्या चाहत्यांनी प्राथर्ना केली आणि त्यांच्या प्रार्थनांना यश आले आहे. उपचारांना चांगला प्रतिसाद दिल्याने, तो या सगळ्यातून लवकर बाहेर पडला आहे.

संबंधित बातम्या : 

नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझाला हृदयविकाराचा धक्का, मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल

Google Search | गूगल इंडियाची यादी जाहिर, ‘कंगना रनौत’ दहाव्या क्रमांकावर फेकली गेली!

(Sanjay Dutt overcomes cancer and attends shooting)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.