Ranbir Alia Wedding: “लवकरच बाबा हो आणि..”; लग्नाच्या चर्चांवर संजय दत्तचा रणबीर कपूरला सल्ला
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या लग्नाची (Ranbir Alia Wedding) जोरदार तयारी सुरू होत आहे. येत्या काही दिवसांत ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. 13 ते 17 एप्रिलदरम्यान मुंबईतल्या आर. के. बंगल्यात मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न पार पडेल, असं म्हटलं जातंय.
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या लग्नाची (Ranbir Alia Wedding) जोरदार तयारी सुरू होत आहे. येत्या काही दिवसांत ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. 13 ते 17 एप्रिलदरम्यान मुंबईतल्या आर. के. बंगल्यात मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न पार पडेल, असं म्हटलं जातंय. रणबीर आणि आलियाने अद्याप याविषयी मौन बाळगलं असलं तरी लग्नाच्या तयारीचे विविध व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच लग्नाच्या चर्चांवर आता अभिनेता संजय दत्तने (Sanjay Dutt) प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणबीर-आलियाच्या लग्नाविषयी बोलताना त्याने रणबीरला खास सल्लासुद्धा दिला आहे. रणबीरने ‘संजू’ (Sanju) या चित्रपटात संजय दत्तची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं प्रेक्षक-समीक्षकांकडून खूप कौतुक झालं होतं.
काय म्हणाला संजूबाबा?
“रणबीर खरंच लग्न करतोय का? जर लग्न करत असेल तर मी त्याच्यासाठी खूप खूश आहे. आलिया तर अक्षरश: माझ्यासमोर लहानाची मोठी झाली. लग्न म्हणजे ते दोघं एकमेकांना सोबत राहण्याचं वचन देत आहेत. हे वचन त्यांना अखेरपर्यंत पाळायचं आहे आणि एकमेकांचा हात धरून आनंदाने आयुष्यात पुढे जायचं आहे. त्या दोघांच्या आयुष्यात सुख-शांती नांदो. रणबीरला माझा सल्ला असेल की लवकरच बाबा हो आणि सदैव खूश रहा”, असं संजूबाबा म्हणाला. केजीएफ: चाप्टर 2 या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान संजयने लग्नाबाबत ही प्रतिक्रिया दिली.
रणबीर कपूरला सल्ला-
“लग्न म्हणजे दोन्ही बाजूंनी तडजोड असते. या प्रवासात अवघड मार्ग येतील आणि जातील, पण त्यातून टिकून राहण्यासाठी एकाला तरी थोडं झुकावं लागेल. मी त्यांना फक्त परिस्थितीचं आकलन करण्याचा सल्ला देईन आणि त्या-त्या वेळी असलेल्या परिस्थितीत कोणाला झुकावं लागेल याबद्दल दोघांनी मिळून ठरवावं. या प्रवासाच्या प्रत्येक वळणावर त्यांना हे लक्षात ठेवावं लागेल की त्यांनी एकमेकांशी केलेली कमिटमेंट खूप महत्त्वाची आहे आणि तीच आयुष्यात एकत्र पुढे जाण्याची गुरुकिल्ली आहे”, असा सल्ला संजय दत्तने दिला.
हेही वाचा:
“.. म्हणून मी अद्याप ‘द काश्मीर फाईल्स’ पाहिला नाही”; सोनू निगमने सांगितलं कारण