The Kerala Story | ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या निर्मात्यांवर भडकले संजय राऊत, थेट केला हा अत्यंत मोठा आरोप
द केरळ स्टोरी हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. द केरळ स्टोरी चित्रपट रिलीज होऊन 9 दिवस होत असताना देखील द केरळ स्टोरी चित्रपटाचा वाद आणि विरोध कमी होताना दिसत नाहीये. अनेकांनी थेट द केरळ स्टोरी या चित्रपटावर बंदी घालण्याची थेट मागणी केली.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून द केरळ स्टोरी (The Kerala Story) हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करताना दिसत आहे. हा चित्रपट 5 मे रोजी रिलीज झालाय. विशेष म्हणजे 9 दिवसांमध्ये चित्रपटाने 100 कोटींचे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले आहे. द केरळ स्टोरी या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. चित्रपट (Movie) धमाकेदार कामगिरी करताना दिसतोय. द केरळ स्टोरी चित्रपटाचा टिझर रिलीज झाल्यानंतरच मोठ्या वादाला तोंड फुटले. अनेकांनी थेट या चित्रपटावर बंदी (Ban) घालण्याची मागणी केली. इतकेच काय तर काहींनी तर थेट चित्रपटाच्या विरोधात कोर्टात धाव देखील घेतली. चित्रपट रिलीज झाल्यानंतरही हा वाद थांबला नाहीये.
द केरळ स्टोरी चित्रपटावर दोन राज्यांमध्ये बंदी आहे. तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यात चित्रपटांवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल सरकारने घेतलेल्या निर्णयावर प्रेक्षकांनी जाहिर नाराजी देखील व्यक्त केली. 37 देशांमध्ये 12 मेला द केरळ स्टोरी हा चित्रपट रिलीज झालाय.
फक्त भारतामध्येच नाही तर द केरळ स्टोरी हा चित्रपट विदेशात देखील धमाल करताना दिसत आहे. मात्र, अनेकजण हे अजूनही द केरळ स्टोरी या चित्रपटाला विरोध करताना दिसत आहेत. नुकताच संजय राऊत यांनी देखील द केरळ स्टोरी चित्रपटाबद्दल लिहिले आहे आणि थेट द कश्मीर फाईल्स चित्रपटाचा दुसरा भाग हा द केरळ स्टोरी असल्याचे म्हटले आहे.
सामनामध्ये साप्ताहिक रोखठोक स्तंभात संजय राऊत यांनी द केरळ स्टोरी चित्रपटाला भाजपचा प्रचार करणारा चित्रपट थेट म्हटले आहे आणि द कश्मीर फाईल्सचा दुसरा भाग देखील म्हटले. भाजपाने कर्नाटक निवडणुकीपूर्वी हिंदू आणि मुस्लिमांचे ध्रुवीकरण करण्यासाठी द केरळ स्टोरी चित्रपटाला वापर केल्याचे त्यांनी म्हटले असून ही चांगली गोष्ट नसल्याचे म्हटले आहे. द केरळ स्टोरी हा चित्रपट खरोखरच खऱ्या घटनेवर आधारित आहे का? हा देखील मोठा प्रश्न राऊतांची उपस्थित केलाय.
पुढे त्यांनी लिहिले की, खरोखरच केरळमध्ये हिंदू मुलींनी इस्लाम धर्म स्वीकारलाय? 32 हजार हिंदू आणि ईसाई मुली या ISIS मध्ये खरोखरच भर्ती झाल्या आहेत? द केरळ स्टोरी चित्रपटाचे निर्देशन हे सुदीप्तो सेन यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सुदीप्तो सेन यांनी हा चित्रपटाच्या स्टोरीवर सात वर्ष काम केले असून सर्व कागदपत्रे असल्याचा देखील दावा केला. मात्र, रिलीजला नऊ दिवस झाले असूनही चित्रपटाचा वाद कमी झाला नाहीये.