Sara Ali Khan | सारा अली खान लग्नासाठी मुलाच्या शोधात, अभिनेत्रीला पाहिजे हे गुण असणारा वर
बाॅलिवूड अभिनेत्री आणि सैफ अली खान याची लेक सारा अली खान ही कायमच चर्चेत असते. सारा तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. नुकताच सारा अली खान हिचा बहुचर्चित चित्रपट रिलीज झालाय. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करतानाही सारा अली खान ही दिसली होती.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी सारा अली खान हिने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये सारा अली खान ही टिंकू जिया या गाण्यावर धमाकेदार डान्स करताना दिसली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) तूफान व्हायरल झाला होता. सारा अली खान हिने काही दिवसांपूर्वीच रिक्षाने प्रवास करतानाच एक व्हिडीओही शेअर केला होता. नुकताच 31 मार्च रोजी सारा अली खान हिचा गॅसलाइट हा चित्रपट (Movie) रिलीज झाला. मात्र, अनेकांना सारा अली खान हिचा या चित्रपटातील अभिनय अजिबात आवडला नाही.
विशेष म्हणजे गॅसलाइट चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करतानाही सारा दिसली. हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला. काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सारा अली खान हिने थेट आशिकी 3 चित्रपटामध्ये काम करण्याची इच्छा जाहिर केली. आशिकी 3 चित्रपटात कार्तिक आर्यन हा मुख्य भूमिकेत असणार आहे. मात्र, निर्मात्यांनी अजून आशिकी 3 चित्रपटासाठी कोणत्याही अभिनेत्रीला फायनल केले नाहीये.
आशिकी 3 चित्रपटासाठी अनेक अभिनेत्रींचे नाव चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी चर्चा होती की, सारा अली खान हिला आशिकी 3 चित्रपटाची आॅफर आलीये. बऱ्याच काळ सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्या अफेअरच्या चर्चा सतत रंगताना दिसत होत्या. विशेष म्हणजे यांचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र, त्यानंतर यांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्या. आता सारा अली खान हिला आशिकी 3 चित्रपटात कार्तिक आर्यन यांच्यासोबत रोमान्स करायचा आहे.
नुकताच सारा अली खान ही शहनाज गिल हिच्या शोमध्ये पोहचली होती. यावेळी सारा अली खान हिने तिच्या लग्नाबद्दल मोठे भाष्य केले आहे. शहनाज गिल हिने सारा अली खान हिला विचारले की, तुझे लग्नाबद्दलचे काय प्लॅनिंग आहे. यावर सारा अली खान हिचे उत्तर ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.
सारा अली खान म्हणाली की, अजून तसे काहीही नाहीये, माझ्याशी लग्न करणारा आंधळा, वेडा शोधावा लागेल. मी सध्या त्याच्या शोधात आहे. त्यावर शहनाज गिल म्हणाली, आंधळा, वेडा का? यावर उत्तर देत सारा म्हणाली मला वाटते, माझ्यासोबत लग्न करणारा पागल आणि आंधळा असावा. कारण जर त्याच्या जवळ डोके असेल तर तो मला ओळखेल आणि पळून जाईल. त्यामुळे मला झेलणारा हवा. आंधळा, वेडा…