Sushant Singh Rajput: सुशांतसाठी साराची भावूक पोस्ट; ‘तुझ्यामुळे अनेक गोष्टी मी पहिल्यांदा अनुभवल्या’

2018 मध्ये केदारनाथ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुशांत आणि सारा एकमेकांना डेट करू लागले, अशीही चर्चा होती. सुशांतच्या मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज अँगलचा तपास करताना साराचीही एनसीबीकडून चौकशी झाली होती.

Sushant Singh Rajput: सुशांतसाठी साराची भावूक पोस्ट; 'तुझ्यामुळे अनेक गोष्टी मी पहिल्यांदा अनुभवल्या'
Sara and SushantImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 3:35 PM

दोन वर्षांपूर्वी 14 जून 2020 रोजी दुपारी जेव्हा अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूची बातमी समोर आली, तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. टेलिव्हिजनपासून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या सुशांतने स्वत:च्या दमदार अभिनय कौशल्याच्या बळावर बॉलिवूडपर्यंतचा यशस्वी प्रवास केला होता. मात्र त्याने घेतलेल्या अचानक एग्झिटमुळे अनेकांवर दु:खाचा डोंगर कोसळला. सुशांतच्या निधनाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त असंख्य चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्या आहेत, त्याचे फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्री सारा अली खाननेही (Sara Ali Khan) सुशांतसाठी खास पोस्ट लिहिली आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साराने ‘केदारनाथ’ (Kedarnath) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि या चित्रपटात तिच्यासोबत सुशांतने मुख्य भूमिका साकारली होती.

सारा अली खानची पोस्ट-

‘पहिल्यांदा कॅमेराला सामोरं जाण्यापासून ते तुझ्या दुर्बिणीतून पहिल्यांदा गुरू आणि चंद्र पाहण्यापर्यंत- तुझ्यामुळे अनेक गोष्टी मी पहिल्यांदा अनुभवल्या. ते सर्व क्षण आणि आठवणी मला दिल्याबद्दल धन्यवाद. आज पौर्णिमेच्या रात्री जेव्हा मी आकाशाकडे पाहीन तेव्हा मला माहित आहे की तू तिथे तुझ्या आवडत्या तारे आणि नक्षत्रांसोबत चमकत असशील. आता आणि कायमचं,’ अशा शब्दांत साराने तिच्या भावना व्यक्त केल्या.

हे सुद्धा वाचा

पहा फोटो-

2018 मध्ये केदारनाथ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुशांत आणि सारा एकमेकांना डेट करू लागले, अशीही चर्चा होती. सुशांतच्या मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज अँगलचा तपास करताना साराचीही एनसीबीकडून चौकशी झाली होती. केदारनाथ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या दोघांचं ब्रेकअप झालं असंही म्हटलं जातं. सारा आणि सुशांत थायलँडला सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी एकत्र गेले होते, अशी माहिती सुशांतचा सहाय्यक साबिर अहमद याने दिली होती. तर सुशांतचा मित्र सॅम्युअल यानेही सारा आणि सुशांत रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं होतं. मात्र या दोघांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.

'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.