Sara Ali Khan | ‘सॉरी अम्मा, अब्बा…’, जखमी झालेल्या सारा अली खानने का मागितली कुटुंबाची माफी?
अलीकडेच साराने एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओसोबतच साराने तिच्या आई-वडिलांची म्हणजेच सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचीही माफी मागितली आहे.
मुंबई : अगदी कमी कालावधीत नवाब कुटुंबाची लेक-अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) हिने आपली एक वेगळी ओळख आणि चित्रपट जगतात आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. सारा अली खानने 2018 मध्ये ‘केदारनाथ’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही विशेष जादू दाखवू शकला नाही, पण सारा निश्चितपणे लोकांच्या हृदयात आपले स्थान बनवण्यात यशस्वी झाली.
चित्रपटांप्रमाणेच सारा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे आणि तिचे विनोद आणि अनोख्या शैलीने तिथल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करायला ती विसरत नाही. आता पुन्हा एकदा सारा प्रसिद्धी झोतात आली आहे. वास्तविक, अलीकडेच साराने एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओसोबतच साराने तिच्या आई-वडिलांची म्हणजेच सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचीही माफी मागितली आहे. एवढेच नाही तर मी नाक कापले, असेही सारा म्हणाली. हे संपूर्ण प्रकरण काय आहे? चला जाणून घेऊया साराने असे काय केले की तिला तिच्या पालकांची माफी मागावी लागली…
नेमकं काय झालं?
अभिनेत्री सारा अली खानने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या नाकाला दुखापत झाल्याचे दिसत आहे. व्हिडीओ शेअर करताना साराने लिहिले, ‘सॉरी अम्मा, अब्बा आणि इग्गी. मी माझे नाक कापले.’ साराचा हा व्हिडीओ आणि त्यासोबत लिहिलेले विचित्र कॅप्शन पाहून चाहते खरोखरच आश्चर्यचकित झाले आहेत. तिचे नाक कापून घेतले म्हणजे तिच्या नाकाला दुखापत झाली, असा त्याचा अर्थ आहे. साराने आपल्या मजेदार पद्धतीने ही गोष्ट सर्वांना सांगितली आहे.
पाहा व्हिडीओ :
View this post on Instagram
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, साराने प्रथम तिचे नाक झाकले आहे आणि काही सेकंदांनंतर जेव्हा ती तिच्या नाकावर ठेवलेला कापूस काढते, तेव्हा तिच्या नाकाला दुखापत झाल्याचे दिसून येते. ज्यामुळे भरपूर रक्तस्त्राव देखील होतो. साराचा हा व्हिडीओ मजेदार आहे, पण काही चाहत्यांनी तिच्याबद्दल चिंताही व्यक्त केली आहे.
अभिनेत्री सारा अली खान केवळ सोशल मीडियावर सक्रिय नाही, तर सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची एक मोठी यादी आहे. तिने इन्स्टाग्रामवर कोणतीही पोस्ट टाकली की, ती लगेच व्हायरल होते. सारा अली खानचे इंस्टाग्रामवर 33 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि ते दिवसेंदिवस वाढतच आहेत.
2018 मध्ये सारा अली खानने ‘केदारनाथ’ चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटात ती सुशांत सिंह राजपूतसोबत दिसली होती. याशिवाय सारा अली खानने इम्तियाज अलीच्या ‘लव आज कल’ या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत काम केले होते. सारा अली खानच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच ‘अतरंगी रे’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती अक्षय कुमार आणि दाक्षिणात्य अभिनेता धनुषसोबत काम करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले आहे.
हेही वाचा :
कोलकाता अश्लील चित्रपट प्रकरण, ‘नॅन्सी भाभी’ने सांगितली या काळ्या जगतातील गुपित!
अनु मलिकसह ‘या’ व्यक्तींवरही झालाय ‘संगीत चोरी’चा आरोप, पाहा कोणकोणती नावं आहेत सामील!