Video | अलिशान गाडी सोडून सारा अली खान थेट मुंबई लोकल ट्रेनमध्ये, व्हिडीओ पाहून चाहत्यांनी केले काैतुक
इतकेच नाहीतर साराचा हा व्हिडीओ पाहून चाहते कमेंट करत काैतुक करताना दिसत आहेत.
मुंबई : सैफ अली खान याची लेक सारा अली खान कायमच चर्चेत असते. सारा चाहत्यांसाठी कायमच बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. नुकताच साराने एक खास व्हिडीओ हा सोशल मीडियावर शेअर केला असून या प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. इतकेच नाहीतर साराचा हा व्हिडीओ पाहून चाहते कमेंट करत काैतुक करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी साराने पल पल न माने टिंकू जिया या गाण्यावर भन्नाट डान्स केला होता. ज्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
नुकताच सारा अली खान हिने वेळ वाचवण्यासाठी अलिशान कार सोडून मुंबईच्या लोकल ट्रेनने प्रवास केला. या प्रवासामध्ये तिने एक खास व्हिडीओही शूट केलाय. सारा अली खान हिच्यासोबत तिची टीम देखील होती.
View this post on Instagram
साराने मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास केला. परंतू चाहत्यांना ओळखू येऊ नये याकरिता तिने मास्क देखील घातले होते. या प्रवासामध्ये सारा मस्ती करताना दिसली. इतकेच नाहीतर यावेळी ती गाणे म्हणताना देखील दिसलीये.
सारा अली खानचा लोकल ट्रेनमध्ये प्रवास करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. इतकेच नाहीतर लोकल ट्रेननंतर तिने रिक्षाने प्रवास केला. याचाही व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केलाय. सारा अली खान हिचा हा व्हिडीओ पाहून चाहते साराचे काैतुक करताना दिसत आहे.
यापूर्वी चित्रपटाच्या प्रमोशनच्या कार्यक्रमाला जाण्यास उशीर होऊ नये, याकरिता अनन्या पांडे हिने देखील लोकल ट्रेनने प्रवास केला होता. साराने ज्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास केला तिथे गर्दी असल्याचे देखील व्हिडीओमधून दिसत आहे.