Sara Ali Khan | चाहत्यांना मोठा धक्का, सारा अली खान हिला पुन्हा एक्स बॉयफ्रेंडसोबत करायचा आहे रोमान्स

बाॅलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही कायमच चर्चेत असते. सारा सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ ती कायमच शेअर करते. सारा अली खान हिने नुकताच एक अत्यंत मोठी इच्छा व्यक्त केलीये. यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसलाय.

Sara Ali Khan | चाहत्यांना मोठा धक्का, सारा अली खान हिला पुन्हा एक्स बॉयफ्रेंडसोबत करायचा आहे रोमान्स
Follow us
| Updated on: Apr 01, 2023 | 2:30 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री आणि सैफ अली खान (Sara Ali Khan) याची लेक सारा अली खान कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी सतत सारा आणि कार्तिक आर्यन यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू होत्या. इतकेच नाहीतर करण जोहर (Karan Johar) याच्या शोमध्ये सारा अली खान पोहचली होती, त्यावेळी जवळपास हे स्पष्ट झाले की सारा आणि कार्तिक यांच्यामध्ये काहीतरी सुरू आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच यांच्या ब्रेकअपच्या बातम्या देखील पुढे आलाय. राजस्थानमधील काही फोटो सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाले. या फोटोमध्ये कार्तिक आर्यन आणि सारा अली खान हे दोघे दिसत होते. सतत यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू होत्या.

काही दिवसांपूर्वीच कार्तिक आर्यन याचा शहजादा हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला बाॅक्स आॅफिसवर धमाका करण्यात यश मिळाले नाही. शहजादा या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि हा चित्रपट फ्लाॅप गेला. शहजादा या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना कार्तिक आर्यन हा दिसला होता.

गेल्या काही दिवसांपासून कार्तिक आर्यन हा त्याच्या आगामी आशिकी 3 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आशिकी 3 चित्रपटामध्ये नेमकी कोणती अभिनेत्री ही मुख्य भूमिकेत असेल हे अजून फायनल झाले नाहीये. आशिकी 3 साठी अनेक अभिनेत्रींचे नाव चर्चेत आहेत. कार्तिक आर्यन हा आशिकी 3 मध्ये मुख्य भूमिकेत असणार हे फायनल आहे.

नुकताच सारा अली खान हिने एक मोठी इच्छा व्यक्त केलीये. सारा अली खान हिने थेट आशिकी 3 या चित्रपटात काम करण्याची इच्छा बोलून दाखवलीये. म्हणजेच सारा अली खास हिला तिच्या एक्स बॉयफ्रेंड कार्तिक आर्यन याच्यासोबत रोमान्स करायचा आहे. आता कार्तिक आर्यन सध्या आशिकी 3 चित्रपटाच्या निर्मात्यांसोबत काम करत आहे.

काही दिवसांपूर्वी चर्चा होत्या की, सारा अली खान हिला आशिकी 3 चित्रपटाची आॅफर आहे. मात्र, यावर सारा अली खान हिने म्हटले की, मला आशिकी 3 चित्रपटात काम करायला आवडेल. निर्मात्यांनी नक्कीच माझा विचार आशिकी 3 चित्रपटासाठी करायला हवा. मात्र, अजून तरी मला आशिकी 3 चित्रपटाची आॅफर आली नाहीये.

एक चर्चा सतत रंगता होती. शहजादा हा चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर आशिकी 3 चित्रपटातून कार्तिक आर्यन याचा पत्ता कट झाल्याची. मात्र, एका रिपोर्टनुसार या फक्त आणि फक्त अफवाच असून आशिकी 3 चित्रपटात कार्तिक आर्यन हाच मुख्य भूमिकेत आहे. कार्तिक आर्यन याच्यासोबत कोणती अभिनेत्री मुख्य भूमिकेत असणार याबद्दल अजून काही फायनल झाले नाहीये.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.