Sunny Leone | ‘शाब्दिक’ वादानंतर सारेगामा बॅकफूटवर, अखेर सनी लिओनच्या ‘मधुबन’ गाण्यात बदल होणार!

नुकत्याच रिलीज झालेल्या ‘मधुबन’ (Madhuban) गाण्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर, सारेगामा या संगीत लेबलने नुकतेच घोषित केले, की ते 'मधुबन' गाण्याचे बोल आणि नाव देखील बदलणार आहेत. या गाण्याबाबत मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आरोप केला होता की, गाण्याच्या व्हिडीओमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.

Sunny Leone | ‘शाब्दिक’ वादानंतर सारेगामा बॅकफूटवर, अखेर सनी लिओनच्या ‘मधुबन’ गाण्यात बदल होणार!
Sunny leone
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 9:44 PM

मुंबई : नुकत्याच रिलीज झालेल्या ‘मधुबन’ (Madhuban) गाण्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर, सारेगामा या संगीत लेबलने नुकतेच घोषित केले, की ते ‘मधुबन’ गाण्याचे बोल आणि नाव देखील बदलणार आहेत. या गाण्याबाबत मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आरोप केला होता की, गाण्याच्या व्हिडीओमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. यादरम्यान मंत्र्यांनी व्हिडीओमध्ये दिसणारी अभिनेत्री सनी लिओनीला (Sunny Leone) गाण्याबद्दल माफी मागावी आणि तिचे ‘मधुबन’ गाणे 3 दिवसांत मागे घ्यावे, अन्यथा तिच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता.

नरोत्तम मिश्रा यांच्याकडून मिळालेल्या या इशाऱ्यानंतर सारेगामाने सोशल मीडियावर अधिकृत निवेदन जारी केले आहे. म्युझिक लेबलने आपल्या निवेदनात लिहिले आहे की, आपल्या देशवासीयांच्या अलीकडील प्रतिक्रिया आणि भावनांचा आदर करून आम्ही मधुबन गाण्याचे नाव आणि बोल बदलू. येत्या 3 दिवसात सर्व प्लॅटफॉर्मवर जुन्या गाण्याऐवजी नवीन गाणे सादर केले जाईल.

पाहा पोस्ट :

विशेष म्हणजे हे गाणे 22 डिसेंबरला रिलीज झाले होते. ते समोर येताच वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. या गाण्याबाबत मध्य प्रदेश सरकारचे प्रवक्ते नरोत्तम मिश्रा म्हणाले होते की, हिंदू राधा मातेची पूजा करतात आणि या गाण्याने लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

सनी लिओनीने माफी मागावी!

यापूर्वी वृंदावनचे संत नवल गिरी महाराज यांनीही या गाण्यावर कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली होती. सरकारने अभिनेत्रीवर कोणतीही कारवाई केली नाही आणि व्हिडीओ अल्बमवर बंदी घातली नाही, तर आम्ही त्याविरोधात न्यायालयात जाऊ, असे ते म्हणाले होते. अभिनेत्रीने तिचे सीन काढून टाकले पाहिजेत, तसेच माफी मागितली नाही तर तिला देशात राहू दिले जाणार नाही, असेही महाराज म्हणाले.

जुन्या गाण्याचे नवे व्हर्जन!

‘मधुबन’ हे गाणे प्रसिद्ध गायिका कनिका कपूर आणि गायक अरिंदम चक्रवर्ती यांनी गायले आहे. त्याचबरोबर सुप्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. 1960 मध्ये आलेल्या कोहिनूर चित्रपटातील ‘मधुबन में राधिका नाचे रे’ या गाण्याचे सुरुवातीचे बोल जुळतात. हे गाणे दिवंगत गायक मोहम्मद रफी यांनी गायले होते आणि दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्यावर ते चित्रित झाले होते.

काही दिवसांपूर्वी डाबर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडनेही त्यांच्या फेम क्रीम ब्लीचची जाहिरात मागे घेतली होती. वास्तविक, या जाहिरातीत एक समलिंगी जोडपे ‘करवा चौथ’ साजरा करताना दाखवण्यात आले होते. या जाहिरातीला विरोध करताना मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी ही जाहिरात आक्षेपार्ह असल्याचे म्हटले होते. तसेच कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा :

Salman Khan : सापाला पाहून सलमानला फुटला घाम! मदत करा म्हणून फोनवर जोरजोरात ओरडला; वाचा मध्यरात्री काय घडलं?

Bigg Boss Marathi 3 Contestants : कोण होणार बिग बॉस मराठी सीझन 3चा विजेता? एलिमिनेट झालेली मीरा म्हणाली होती…

Sushmita Sen : रोहमन शॉलसोबतच्या ब्रेक-अपनंतर सुष्मिता सेननं शेअर केली पोस्ट; म्हणाली, खुश राहण्यासाठी…

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.