राज कुंद्राच नाही तर शिल्पा शेट्टीवरही लावले गंभीर आरोप, शर्लिन चोप्राने दाखल केला FIR!

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) हे गेल्या अनेक दिवसांपासून हेडलाईन्सचा एक भाग बनले आहेत. अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. तो सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहे.

राज कुंद्राच नाही तर शिल्पा शेट्टीवरही लावले गंभीर आरोप, शर्लिन चोप्राने दाखल केला FIR!
Shilpa Shetty-raj-sherlyn
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 10:49 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) हे गेल्या अनेक दिवसांपासून हेडलाईन्सचा एक भाग बनले आहेत. अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. तो सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहे. राज कुंद्राची अटक आणि जामिनानंतर आता शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) हिने त्याच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. आता तिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.

शर्लिनने राज आणि शिल्पावर फसवणूक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. शर्लिन चोप्राला राज कुंद्रा प्रकरणादरम्यान अनेक आरोपांना सामोरे जावे लागले होते. तिलाही चौकशीसाठी बोलावले गेले होते. ज्याबद्दल तिने सोशल मीडियावर सांगितले आहे.

राज आणि शिल्पाविरोधात दाखल केली तक्रार

शर्लिन चोप्रा हिने 14 ऑक्टोबर रोजी राज आणि शिल्पाविरोधात एफआयआर दाखल केला होता. तिने याबाबत मीडियाशी संवाद साधला आहे. ती म्हणाले की, मी राज कुंद्राविरोधात लैंगिक छळ, फसवणूक आणि धमकी दिल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे.

गंभीर आरोप केले

पत्रकार परिषदेत शर्लिन चोप्रा म्हणाली की, ‘त्यांनी मला अंडरवर्ल्डची धमकी दिली होती. तुम्ही हे नीट लक्षात ठेवले पाहिजे की, तुम्ही माझा लैंगिक छळ केला आहे, तुम्ही मुलींना त्यांचे शरीर दाखवण्याचे पैसे का देत नाही? तुम्ही त्यांना फसवता. तो कलाकाराच्या घरी जातो आणि त्याला अंडरवर्ल्डची धमकी देतो. तो म्हणतोय लैंगिक अत्याचाराची तक्रार मागे घ्या, अन्यथा तुमचे आयुष्य उध्वस्त होईल.’

एप्रिलमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेली होती शर्लिन

शर्लिन चोप्रा हिने असेही सांगितले आहे की, 14 एप्रिल 2021 रोजी तिने जुहू पोलीस स्टेशनला राज कुंद्राविरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यास सांगितले होते. 19 एप्रिल रोजी राजने जबरदस्तीने माझ्या घरात प्रवेश केला आणि मला केस मागे घेण्याची धमकी दिली. शर्लिन म्हणाली की, त्याने मला अंडरवर्ल्डची धमकी दिली आणि अनेक धमक्या दिल्या. मी एकटी भयभीत महिला आहे. मी एकटीच राहते, मला भीती वाटली. मात्र, आज मी धैर्याने परत आले आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती-व्यावसायिक राज कुंद्रा अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी सुमारे 2 महिन्यांपासून तुरुंगात आहेत. आता तो जामिनावर तुरुंगातून बाहेर आला आहे आणि त्याने त्याचे सोशल मीडिया अकाऊंट देखील खाजगी केले आहे.

हेही वाचा :

Sardar Udham Review : विकी कौशलच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट, शूजित सरकारने पुन्हा एकदा हृदय जिंकले!

Happy Birthday Rajeev Khandelwal | एकता कपूरच्या मालिकेतून राजीव खंडेलवालला मिळाली होती प्रसिद्धी, #MeTooमुळे देखील आला होता चर्चेत!

Akshay Gorkha Look : आता अक्षय कुमार दिसणार ‘गोरखा’मध्ये, पोस्टर प्रदर्शित करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी!

मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.