करण जोहरचा आयकॉनिक चित्रपट पाहून भडकल्या होत्या शबाना आझमी, फोन करून सुनावले खडे बोल!

एक काळ होता जेव्हा करण जोहरचे रोमँटिक चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप हिट झाले होते. शाहरुख खान आणि काजोलची जोडी बहुतेक त्याच्या सर्व चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली. करण जोहरने मोठ्या पडद्यावर ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘कभी खुशी कभी गम’ आणि ‘कुछ कुछ होता है’ असे अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत.

करण जोहरचा आयकॉनिक चित्रपट पाहून भडकल्या होत्या शबाना आझमी, फोन करून सुनावले खडे बोल!
Karan Johar
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 8:35 AM

मुंबई : एक काळ होता जेव्हा करण जोहरचे रोमँटिक चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप हिट झाले होते. शाहरुख खान आणि काजोलची जोडी बहुतेक त्याच्या सर्व चित्रपटांमध्ये पाहायला मिळाली. करण जोहरने मोठ्या पडद्यावर ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘कभी खुशी कभी गम’ आणि ‘कुछ कुछ होता है’ असे अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत.

करण जोहरचा ‘कुछ कुछ होता है’ हा असाच एक चित्रपट होता ज्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या चित्रपटाने लोकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. लोकांनाही या चित्रपटातील पात्रे खूप आवडली. राणी मुखर्जी, काजोल आणि शाहरुख खानची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली. पण एकीकडे जिथे प्रेक्षकांना त्यांची जोडी आवडली, तिथे बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी यांना ते अजिबात आवडले नाही. हा चित्रपट पाहिल्यानंतर शबाना आझमी खूप भडकल्या आणि एवढेच नाही तर त्यांनी करण जोहरला बरेच सुनावले..

का संतापल्या शबाना आझमी?

करण जोहरने 2019 मध्ये मेलबर्न येथे आयोजित भारतीय चित्रपट महोत्सवात शबाना आझमींबद्दलचा हा खुलासा केला होते. तो म्हणाला की, ‘कुछ कुछ होता है’ संदर्भात त्यांना गैरसमज झाला होता. शबाना आझमी यांनी हा चित्रपट यूके मध्ये पाहिला होता आणि चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी मला फोन केला. शबाना आझमी म्हणाल्या की, हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांना खूप धक्का बसला आहे.

करण जोहर पुढे म्हणाला, ‘शबाना जींनी मला फोन करून विचारले की, तुम्ही या चित्रपटात काय दाखवले आहे? जर मुलीचे केस लहान असतील तर ती सुंदर नाही. जेव्हा तिचे केस लांब झाले, तेव्हा ती सुंदर झाली. हे काय आहे. आणि मला विचारले की तुम्हाला याबद्दल काय म्हणायचे आहे? त्यानंतर मी त्यांची माफी मागितली. यावर त्या म्हणाल्या की, ‘तुला एवढेच म्हणायचे आहे.’  मी हो म्हणालो, कारण मला माहित आहे की, तुम्ही बरोबर बोलत आहात’.

शाहरुख खाननेही केली टीका केली!

शाहरुख खानचा हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. मात्र, स्वतः शाहरुखने या पात्रावर टीका केली होती. शाहरुख खानने या चित्रपटात राहुलची भूमिका साकारली होती. हे पात्र देखील लोकांना खूप आवडले होते, जरी नंतर स्वतः शाहरुख खानने त्यावर टीका केली होती. करण जोहर म्हणाला, ‘शाहरुखचे पात्र खूप गोंधळलेले होते आणि त्याला काय हवे होते हे त्यालाच माहित नव्हते.’

‘कुछ कुछ होता है’मध्ये तर्क नव्हता!

याबद्दल बोलताना करण जोहर पुढे म्हणाला, ‘जे काही घडले ते लोक त्याला पुढे ढकलत होते म्हणून….त्याचेचे आकर्षण, आणि शाहरुख खानचा वैयक्तिक करिश्मा यामुळे त्या पात्राला सर्वात खास बनवले गेले.’ आपल्या चित्रपटाबद्दल बोलताना स्वतः करण जोहर म्हणाला की ‘कुछ कुछ होता है’ मध्ये तसे कोणतेही लॉजिक नव्हते.

हेही वाचा :

Suyash Tilak Wedding : अभिनेता सुयश टिळक अभिनेत्री आयुषी भावेसोबत लग्नबंधनात, पाहा खास क्षणाचे फोटो

Sanskruti Balgude : ‘सुनहरा रूप..’ म्हणत अभिनेत्री संस्कृती बालगुडेनं शेअर केले सुंदर फोटो; पाहा क्लासी लूक

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.