Pathan : ‘पठान’च्या गाण्याच्या शूटिंगसाठी शाहरुख-दीपिका जाणार स्पेनला, जाणून घ्या आणखी काय खास

चित्रपटाशी संबंधित एका सूत्रानं सांगितलं की, सिद्धार्थ आनंद या चित्रपटासाठी स्पेनला जाण्यासाठी सज्ज आहे. चित्रपटातील एक गाणं स्पेनमध्ये शूट केलं जाईल. याशिवाय या चित्रपटात दीपिका आणि शाहरुख खानसोबत जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. (Shah Rukh-Deepika to go to Spain to shoot 'Pathan' song, find out what's more special)

Pathan : 'पठान'च्या गाण्याच्या शूटिंगसाठी शाहरुख-दीपिका जाणार स्पेनला, जाणून घ्या आणखी काय खास
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 12:59 PM

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सध्या त्यांच्या ‘पठान’ (Pathan) चित्रपटाच्या शूटिंगबद्दल चर्चेत आहेत. आता अशी बातमी आहे की ही जोडी स्पेनला या चित्रपटाच्या एका गाण्याच्या चित्रीकरणासाठी जाण्याच्या तयारीत आहे. शाहरुख खानचा हा चित्रपट सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाचा काही भाग स्पेनमध्ये शूट केला जाणार आहे आणि बिग बजेट गाणं देखील स्पेनमध्ये शूट केलं जाईल.

टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, चित्रपटाशी संबंधित एका सूत्रानं सांगितलं की, सिद्धार्थ आनंद या चित्रपटासाठी स्पेनला जाण्यासाठी सज्ज आहे. चित्रपटाच्या शूटिंगशी संबंधित सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत. या चित्रपटात आपण एक धमाकेदार व्हीएफएक्स पाहणार आहोत. एवढंच नाही तर चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते सिद्धार्थ आनंद आणि आदित्य चोप्रा हे जागतिक पातळीवर या चित्रपटाचं शूटिंग करत आहेत. या कामासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत.

‘पठान’मध्ये झळकणार जॉन अब्राहम

या चित्रपटात दीपिका आणि शाहरुख खानसोबत जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. जॉन या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे, जो या चित्रपटात शाहरुख खानला कठोर स्पर्धा देणार आहे. जॉननं अलीकडेच यशराज स्टुडिओ मुंबईतच या चित्रपटाचे शूटिंग सुरू केलं. त्यानंतर आता त्याचं वेळापत्रक पूर्ण झालं आहे. ज्यामुळे चित्रपटाच्या टीमनं आता परदेशात जाऊन चित्रपटाचं गाणं शूट करण्याचा निर्णय घेतला आहे. जॉनसोबत तुम्हाला या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता आशुतोष राणासुद्धा बघायला मिळणार आहो. या चित्रपटात अभिनेता आशुतोष राणा रॉच्या संयुक्त सचिवाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर डिंपल कपाडिया देखील या चित्रपटात त्याला साथ देताना दिसणार आहे.

या चित्रपटाचं शूटिंग लॉकडाऊन दरम्यानच सुरू झालं, शाहरुख खाननं दुबईला जाऊन या चित्रपटाचे अॅक्शन सीक्वन्स शूट केले. तसेच या चित्रपटात, सलमान खानला आपण एक उत्कृष्ट कॅमिओ करताना देखील पाहु शकणार आहोत. पठानमध्ये बॉलीवूडच्या टायगरची एंट्री पाहण्यासाठी प्रेक्षकही आतुरतेनं वाट पाहत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हे येणारा काळच सांगेल.

संबंधित बातम्या

Shweta Tiwari : हॉट मॉम श्वेता तिवारीच्या दिलखेचक अदा, ग्लॅमरस फोटोंवर चाहते फिदा

Birthday Special : सिनेमातील अभिनेत्यांचा दोस्त; पत्नीसोबतच्या वादामुळेही चर्चेत, दीपक तिजोरीचा फिल्मी प्रवास रंजक आणि वादळीही

Video : ‘कभी खुशी कभी गम’ म्हणत ‘आई कुठे काय करते’तील कलाकारांनी शेअर केला मजेदार रील, पाहा व्हिडीओ

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.