Shah Rukh Khan : शाहरुख खाननं आलिया भट्टकडे मागितलं काम, म्हणाला ‘मी शूटिंगसाठी वेळेवर येईन…’
अभिनेत्री आलिया भट्ट 'डार्लिंग्स' चित्रपटाद्वारे निर्माती म्हणून पदार्पण करतेय. (Shah Rukh Khan asked Alia Bhatt for work, he said 'I will come on time for shooting ...')
मुंबई : आलिया भट्टनं (Alia Bhatt) डार्लिंग्स (Darlings) चित्रपटाचं शूटिंग सुरू केलं आहे. आलिया या चित्रपटाद्वारे निर्माती म्हणून पदार्पण करतेय. आलियानं सेटवरचे तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि चाहत्यांना माहिती दिली की ती शूटिंगच्या पहिल्या दिवशी उत्साहित आहे आणि थोडी घाबरलेली सुद्धा आहे. शाहरुख खान (Shah Rukh Khan) आलियाच्या या कामामुळे खूप खुश आहे. एवढंच नाही तर त्यानं आलियाला स्वतःसाठी काम मागितलं आहे.
आलियाची पोस्ट शेअर करत शाहरुखनं लिहिलं की, ‘या प्रॉडक्शन नंतर कृपया मला तुमच्या होम प्रॉडक्शनच्या पुढील प्रोजेक्टसाठी संधी द्या. मी शूटसाठी वेळेवर येईन आणि व्यावसायिक वागणूक ठेवेन…
पाहा शाहरुखची पोस्ट
After this production please sign me up for your next home production little one. I will come in time for the shoot and be very professional..promise! https://t.co/rXzha7LmZR
— Shah Rukh Khan (@iamsrk) July 3, 2021
पाहा आलिया भट्टची इन्स्टाग्राम पोस्ट
View this post on Instagram
आलियानं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, सेटवर परत आल्यामुळे खूप आनंद झाला आहे आणि मी उत्साहित आहे. बर्याच दिवसांपासून या चित्रपटाबद्दल उत्साही होते. माझे सहकारी कलाकार विजय वर्मा आणि शेफाली शहा यांच्या प्रतिभेच्या बरोबरीनं मला काम करावं लागणार आहे यासाठी मला शुभेच्छा द्या.
डार्लिंग्ज ही अशा आई-मुलीच्या जोडीची कहाणी आहे जी जीवनात आपलं स्थान शोधण्यासाठी वेगवेगळ्या परिस्थितीतून जात असतात.
गंगूबाई काठियावाडीचं शूटिंग पूर्ण
नुकतंच आलियानं संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गंगूबाई काठियावाडीचे शूटिंग पूर्ण केले आहे. आलियाने या चित्रपटाच्या सेटमधून टीम आणि संजय लीला भन्साळीसोबत काही फोटो शेअर केले होते.
आलियाने एक भावनिक पोस्ट लिहिली होती, ‘आम्ही 8 डिसेंबर 2019 रोजी गंगूबाईचं शूटिंग सुरू केलं आणि आज 2 वर्षानंतर आम्ही शूटिंग पूर्ण केलं आहे. हा चित्रपट आणि चित्रपटाच्या सेटनं 2 लॉकडाऊन आणि 2 वादळं पाहिली आहेत. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दिग्दर्शक आणि अभिनेते कोरोनाच्या विळख्यात अडकले होते. पण मुख्य म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून मी आयुष्याचा एक मोठा अनुभव घेतला आहे. सरांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात काम करणं हे माझं मोठं स्वप्न होतं, आज मी हा सेट वेगळी व्यक्ती म्हणून सोडत आहे. आय लव्ह यू सर खूप खूप धन्यवाद. तुमच्या सारखे कोणी नाही. ‘
संबंधित बातम्या
Aamir Khan Kiran Rao Divorce : आमिर-किरणचा घटस्फोट फातिमा शेखमुळे?, दोघांच्या रिलेशनशिपची चर्चा
Bigg Boss Marathi 3 | ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाची उत्सुकता, ‘या’ कलाकारांच्या नावांची चर्चा