Video: करण जोहरच्या पार्टीत शाहरुखचा ‘कुछ कुछ होता है’मधील गाण्यावर डान्स; नेटकरी ‘किंग खान’च्या प्रेमात

या व्हिडीओमध्ये शाहरुख (SRK) 'कोई मिल गया' या गाण्यावरील स्टेप्स करताना दिसत आहेत. त्याच्यासोबत दिग्दर्शिका फराह खानसुद्धा नाचताना पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे फराह खाननेच या गाण्याची कोरिओग्राफी केली होती.

Video: करण जोहरच्या पार्टीत शाहरुखचा 'कुछ कुछ होता है'मधील गाण्यावर डान्स; नेटकरी 'किंग खान'च्या प्रेमात
शाहरुख खानImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 10:02 AM

निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) नुकताच त्याचा 50वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त त्याने मुंबईतील यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं. अवघं बॉलिवूड या पार्टीला अवतरलं होतं. रेड कार्पेटवरील सेलिब्रिटींचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता या पार्टीतील काही व्हिडीओ समोर येत आहेत. त्यातल्याच एका व्हिडिओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओमध्ये बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा त्याच्या ‘कुछ कुछ होता है’ (Kuch Kuch Hota Hai) या गाजलेल्या चित्रपटातील गाण्यावर नाचताना पहायला मिळत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. करण जोहरनेच ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. आजही हा चित्रपट अनेकांच्या आवडीच्या चित्रपटांच्या यादीमध्ये आवर्जून आढळतो. या चित्रपटात शाहरुखसोबत काम करणारे कलाकार काजोल आणि राणी मुखर्जीसुद्धा वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित होते.

या व्हिडीओमध्ये शाहरुख ‘कोई मिल गया’ या गाण्यावरील स्टेप्स करताना दिसत आहेत. त्याच्यासोबत दिग्दर्शिका फराह खानसुद्धा नाचताना पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे फराह खाननेच या गाण्याची कोरिओग्राफी केली होती. अभिनेता मनिष पॉलसुद्धा शाहरुखसोबत डान्स करताना दिसत आहे. 1998 मध्ये ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून करण जोहरने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. यामध्ये शाहरुखच्या भूमिकेचं नाव ‘राहुल’ होतं. यावरूनच नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. ‘ओह माय गॉड! राहुल परत आलाय’, असं एकाने लिहिलं. तर ‘हा व्हिडीओ स्वप्नवत आहे, मी कितीही वेळा पाहू शकते’ असं दुसऱ्या युजरने म्हटलं.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by @varindertchawla

करण जोहरच्या या पार्टीत अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, करीना कपूर खान, सैफ अली खान, मलायका अरोरा, सलमान खान, आमिर खान, मनिष मल्होत्रा, जान्हवी कपूर, हृतिक रोशन, राणी मुखर्जी, काजोल यांसारखे अनेक कलाकार उपस्थित होते. केवळ बॉलिवूडच नाही तर टॉलिवूडमधील विजय देवरकोंडा, रश्मिका मंदाना, तमन्ना भाटिया हे कलाकारसुद्धा पार्टीला हजर होते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.