लेक सुहानाची ‘फादर्स डे’ पोस्ट पाहून शाहरुख खान झाला भावूक, प्रतिक्रिया देताना म्हणाला…
बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरुख खान (Shah Rukh Khan) याची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) हिने सोशल मीडियावर एक सुंदर फोटो शेअर करत त्याला ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुहानाने तिच्या बालपणीचे फोटो तिच्या इंस्टा स्टोरीवर ठेवले होते.
मुंबई : बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरुख खान (Shah Rukh Khan) याची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) हिने सोशल मीडियावर एक सुंदर फोटो शेअर करत त्याला ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुहानाने तिच्या बालपणीचे फोटो तिच्या इंस्टा स्टोरीवर ठेवले होते. या फोटोत शाहरुख तिला किस करताना दिसत आहे. ‘फादर्स डे’ शुभेच्छांसह सुहानाने हार्ट इमोजी देखील पोस्ट केल्या होत्या. त्याचवेळी शाहरुख खानने देखील आपल्या मुलीच्या या पोस्टवर भावनिक प्रत्युत्तरही दिले आहे (Shah Rukh Khan Emotional reaction on daughter Suhana Khan Fathers Day post).
शाहरुखने रीपोस्ट केला फोटो
शाहरुख खानने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर सुहानाची इंस्टा स्टोरी पुन्हा पोस्ट केली आहे. प्रतिक्रिया देताना त्यावर लिहिलेले की, ‘मिस यू बेबी, मला तुझी इतकी आठवण येते की मी इमोजी वापरत आहे.’ शाहरुख खानच्या कॅप्शनवरून असे दिसते आहे की, तो फार इमोजी वापरत नाही, तर त्याने केवळ आपल्या मुलीच्या आठवणीत इमोजी वापरल्या आहेत.
मित्रांसह धमाल
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची (Shah Rukh Khan) दोन्ही मुले नेहमीच चर्चेत असतात. शाहरुख खानची लेक सुहाना खान (Suhana Khan) सध्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. सुहानाची छायाचित्रे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. सुहानाने काही दिवसांपूर्वीच आपला नवीन फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ती तिच्या मित्रांसह धमाल करताना दिसली होती. शाहरुखची लेक सुहाना खान सध्या अमेरिकेत शिकत आहे. जिथे ती बर्याचदा आपल्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसते
न्यूयॉर्कमध्ये शिकतेय
रविवारी, शाहरुख खाननेही ‘फादर डे’ सर्व वडिलांना समर्पित एक पोस्ट केली होती. त्याने चार खेळण्यांचे चित्र पोस्ट केले होते, जे त्याचे आणि तीन मुलांचे प्रतिनिधित्व करत होते. सुहाना खान सध्या न्यूयॉर्कमध्ये शिकत आहे. जानेवारी महिन्यात ती पुन्हा अमेरिकेत गेली होती. गेल्या वर्षी कोरोना दरम्यान ती मुंबईत आली होती. इथे तिने कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवला. तिची आई गौरी खानने तिच्यासोबत फोटोशूट केले, जे सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले.
मुलांनी अभिनय शिकावा…
सुहाना खानचे वडील अर्थात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची इच्छा आहे की, सुहानाने आता तिचे काम अधिक योग्यरित्या शिकावे. शाहरुख खानने आपल्या एका मुलाखतीत बोलताना सांगितले होते की, सुहानाला अभिनेत्री व्हायचे असेल, तर तिने पहिले 3-4 वर्षे अभिनय शिकले पाहिजे. तो म्हणाला होता, मला माहित आहे की, इंडस्ट्रीतील माझ्या बर्याच मित्रांना माझ्या मुलांनी लगेच अभिनय करण्यास सुरुवात करावी, अशी इच्छा आहे. पण, मला नेहमीच वाटते की, त्यांनी आता लगेच अभिनय करू नये.
(Shah Rukh Khan Emotional reaction on daughter Suhana Khan Fathers Day post)