मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या पठाण (Pathaan) या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. सध्या बाॅक्स आॅफिसवर पठाण चित्रपटाची हवा बघायला मिळत आहे. या चित्रपटाने धमाकेदार ओपनिंग करत पाच दिवस जबरदस्त बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले आहे. विशेष म्हणजे चित्रपट रिलीज होऊन फक्त पाच दिवस झाले आहेत. या चित्रपटाला देशातच नाहीतर विदेशात देखील प्रेम मिळत आहे. रविवारी पठाण चित्रपटाने (Movie) बाॅक्स आॅफिसवर तब्बल ६२ कोटींचे कलेक्शन केले. या चित्रपटाला विकेंडचा भरपूर फायदा नक्कीच झालाय. ओपनिंग डेला भारतामधून पठाण चित्रपटाने ५४ कोटींचे कलेक्शन केले होते. जगभरातून १०० कोटींचा आकडा ओपनिंग डेलाच गाठण्यात पठाणला यश मिळाले. मुळात म्हणजे गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जात होते. मात्र, पठाण चित्रपटामुळे बाॅलिवूडला एक वेगळीच उमीद मिळालीये.
पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. बेशर्म रंग हे गाणे बघितल्यानंतर अनेकांचा पारा चढला होता. सोशल मीडियावर पठाण चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सातत्याने केली जात होती.
या सर्व वादाचा फायदा हा पठाण चित्रपटालाच झाल्याचे बाॅक्स आॅफिस कलेक्शनवरून आता स्पष्ट होत आहे. विशेष बाब म्हणजे अनेक चित्रपट निर्माता हे चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कोट्यावधी रूपये खर्च करतात. मात्र, शाहरुख खान याने पठाण चित्रपटाचे प्रमोशन करण्यावरही भर दिला नव्हता.
पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर शाहरुख खान हा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत होता. ASK SRK सेशनमध्ये शाहरुख खान हा आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत होता.
नुकताच शाहरुख खान, दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम आणि चित्रपटाचे डायरेक्टर सिद्धार्थ आनंद हे मीडियासमोर आले होते. यावेळी शाहरुख खान म्हणाला की, काही विशेष कारण नव्हते मुलाखत न देण्याचे.
कारण पठाण या चित्रपटाचे जवळपास काम हे कोरोनाच्या काळात झाले आहे. यामध्ये सतत व्यस्त असल्यामुळे मुलाखत देणे शक्य झाले नाही. यामुळे मुलाखत न देणे हे अजिबातच ठरवले नव्हते. आज पठाण चित्रपटाच्या टीमकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.