शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!

शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) आगामी चित्रपट 'पठाण' ची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहे.

शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी!
‘पठाण’ या चित्रपटासाठी बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खाननं 120 कोटी मानधन घेतलं आहे.
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 11:17 AM

मुंबई : शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) आगामी चित्रपट ‘पठाण’ ची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करीत आहेत, ज्यांनी यापूर्वी वॉरसारखे सुपरहिट चित्रपट केले आहेत. पठाण हा चित्रपट एक मोठा मल्टीस्टारर चित्रपट मानला जात आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत सलमान खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमही दिसणार आहेत. जेव्हा पठाण या चित्रपटाची घोषणा करण्यात आली तेंव्हापासून चाहत्यांचा आनंद गगणात मावत नाहीये. (Shah Rukh Khan is likely to appear in this new film)

आता शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी आणखीन एक महत्वाची बातमी आहे शाहरुख खान राजकुमार हिरानीसोबत आणखी एक मोठा चित्रपट करणार आहे अशी बातमी आहे. आणि पठाण चित्रपटाच्या रिलीजची तारीखही पुढे आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार पठाण चित्रपट याच वर्षी चित्रपटग्रहात रिलीज होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोण शाहरुख खानसह झळकणार आहे. हा चित्रपट एक अ‍ॅक्शन ड्रामा फिल्म आहे. या चित्रपटात दीपिका बर्‍यापैकी अ‍ॅक्शन सीन करताना दिसणार आहे. ज्याप्रमाणे ‘एक था टायगर’मध्ये कतरिनाची भूमिका होती, तशीच दीपिका ‘पठाण’मध्ये दिसणार आहे.

या चित्रपटाद्वारे आता दीपिका कतरिनाशी अ‍ॅक्शन करू शकेल की नाही, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मध्यंतरी चर्चा होती की, हृतिक रोशन देखील पठाण या चित्रपटात दिसू शकतो. असे सांगितले जात आहे की, चित्रपटात हृतिकलाही कास्ट केल्याची चर्चा आहे. सिद्धार्थने हृतिकबरोबर ‘वॉर’ चित्रपटात काम केले आहे आणि त्याच वेळी त्याने ‘पठाण’ मध्ये कबीरच्या भूमिका करण्याविषयी हृतिक अॅफरही दिली असल्याचे बोलले जात होते.

संबंधित बातम्या : 

अंकिताचं ठरलं! जुनं विसरुन नवा संसार थाटायचा, मेहंदीच्या कार्यक्रमाचे फोटो व्हायरल?

वर्षातील सगळ्यात मोठा चित्रपट, भारत पाकिस्तान युद्धाचा थरार दाखवणार, निखिल द्विवेदीची घोषणा!

Unseen Roka Photos | रोका सेरेमनीचे वरुण-नताशाचे फोटो पाहून, चाहते म्हणाले, ‘व्वा क्या बात है…’

(Shah Rukh Khan is likely to appear in this new film)

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....