Shah Rukh Khan | पठाण चित्रपटाच्या यशानंतर शाहरुख खान याने केले मोठे भाष्य, थेट म्हणाला हा व्यवसाय नाही

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या पठाण या चित्रपटामुळे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले आहेत. शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरलाय.

Shah Rukh Khan | पठाण चित्रपटाच्या यशानंतर शाहरुख खान याने केले मोठे भाष्य, थेट म्हणाला हा व्यवसाय नाही
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 9:57 PM

मुंबई : शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज होऊन आता तब्बल 42 दिवस झाले आहेत. या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर तूफान अशी कामगिरी नक्कीच केलीये. शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा पठाण हा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. 2019 मध्ये शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि हा चित्रपट फ्लाॅप गेला. तेंव्हापासून शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर होता. शेवटी पठाण चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान याने दणदणीत पुनरागमन केले.

शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर मोठ्या वादाला तोंड फुटले होते. बेशर्म रंग या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने वाद निर्माण झाला. अनेकांनी थेट या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणीही सोशल मीडियावर करून केली. अनेक संघटनांनी चित्रपटाच्या विरोधात मोर्चा वळवला.

विशेष म्हणजे शाहरुख खान हा देखील पठाण चित्रपटाचे खास प्रमोशन करताना दिसला नाही. शाहरुख खान हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर चाहत्यांच्या संपर्कात होता. सोशल मीडियावर सतत सेशन घेताना शाहरुख खान दिसला. या सेशनमध्ये शाहरुख खान चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देत. विशेष म्हणजे चित्रपट रिलीज होऊनही शाहरुख खान अजूनही चाहत्यांसाठी सेशनचे आयोजन करतो.

नुकताच शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या यशानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीये. शाहरुख खान याने पोस्टमध्ये म्हटले आहे की, हा व्यवसाय नाही, हे पूर्णपणे पर्सनल आहे. लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणे आणि त्यांचे मनोरंजन करणे हे आमचे एक प्रकारचे काम आहे आणि जर आपण ते वैयक्तिकरित्या घेतले नाही तर ते कधीही होणार नाही.

पुढे शाहरुख खान म्हणाला की, ज्यांनी पठाणला प्रेम दिले आणि ज्यांनी चित्रपटात काम करून मेहनत घेतली त्या सर्वांचे आभार….जय हिंद…आता शाहरुख खान याची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. शाहरुख खान चार वर्षांनी इतक्या धमाकेदार पध्दतीने बाॅलिवूडमध्ये परत येईल, असा विचारही कोणी केला नसले.

बाॅलिवूडचे बिग बजेटचे चित्रपट फ्लाॅप जात असताना शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट हिट ठरला आहे. शाहरुख खान याच्या चाहत्यांमध्ये सुरूवातीपासूनच पठाण चित्रपटाबद्दल कमालीचे क्रेझ बघायला मिळाली. पठाण चित्रपटानंतर कार्तिक आर्यन याचा शहजादा आणि अक्षय कुमार याचा सेल्फी चित्रपट फ्लाॅप गेलाय.

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.