अनुभव शेअर करत शाहरुख खान याने केले ‘जॉन अब्राहम’चे काैतुक
या चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपिका पाहुकोण आणि जाॅन अब्राहम महत्वाच्या भूमिकेत आहेत.
मुंबई : शाहरुख खान सध्या पठाण चित्रपटामुळे चर्चेत आहे. पठाण हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. शाहरुखचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपिका पाहुकोण आणि जाॅन अब्राहम महत्वाच्या भूमिकेत आहेत. शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या दिवशीच पठाणचे टीझर रिलीज करण्यात आले. या टीझरमध्ये शाहरुख खानचा लूक एकदम जबरदस्त दिसतोय. हा चित्रपट एका भारतीय जासूसवर आधारित आहे.
शनिवारी चाहत्यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना एका चाहत्याने शाहरुख खानला विचारले की, जाॅन अब्राहमसोबत काम करून तुम्हाला कसा अनुभव मिळाला? यावर बोलताना शाहरुख म्हणाला की, मुळात जाॅन अब्राहम हा अत्यंत शांत व्यक्तीमहत्व आहे. त्याचा व्यवहार खूप जास्त चांगला आहे. मी खूप वर्षांपासून जाॅन अब्राहमला ओळखतो. मला खरोखरच जाॅनसोबत काम करून आनंद झालाय.
शाहरुख खान, जाॅन अब्राहम आणि दीपिका पादुकोण पठाण चित्रपटात काय धमाका करतात, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. टीझर रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर पठाण चित्रपटा विरोधात एक मोहिम सुरू झालीये. टीझरमध्ये काही दम नसल्याचे अनेकांचे म्हणणे असून हाॅलिवूड चित्रपटांची काॅपी करण्यात आल्याचे अनेकांचे म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काही धमाका करू शकत नाहीत. कारण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरच सोशल मीडियावर चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मोहिम सुरू होते. ‘#Boycott Pathaan हा ट्रेंडही सोशल मीडियावर सुरू झालाय. पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे.