Pathaan Controversy : Shah Rukh Khan ने मौन सोडलं, आश्चर्य़चकीत करणारं वक्तव्य
ट्रोलर्स या गाण्यावर टीका करत थेट पठाण चित्रपटाला बायकॉट करण्याची मागणी करत आहेत.
मुंबई : शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाची चाहते गेल्या कित्येक वर्षांपासून वाट पाहात आहेत. शेवटी या चित्रपटामधील बेशरम रंग हे गाणे रिलीज झाले आहे. मात्र, हे गाणे रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर जणू संतापाची लाटच निर्माण झालीये. ट्रोलर्स या गाण्यावर टीका करत थेट पठाण चित्रपटाला बायकॉट करण्याची मागणी करत आहेत. इतकेच नाहीतर पठाण चित्रपटाच्या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण हिने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने देखील सतत टीका केली जात आहे. आता यावर शाहरुख खान याने अखेर माैन सोडले आहे.
कोलकाता फिल्म फेस्टिवलमध्ये बोलत असताना सोशल मीडियावर ज्याप्रकारे ट्रोलर्स हे बेशरम रंग या गाण्याला ट्रोल करत आहेत, यावर शाहरुख खान याने चांगलाच समाचार घेतला आहे.
शाहरुख खान म्हणाला की, काही लोक हे सोशल मीडियावर नकारात्मकता पसरवत आहेत. इतकेच नाहीतर शाहरुख खान म्हणाला चित्रपट हे समाज बदलण्याचे एक माध्यम आहे.
#WATCH | No matter what the world does, people like us will stay positive: Shah Rukh Khan at Kolkata International Film Festival pic.twitter.com/QL6uyRFACS
— ANI (@ANI) December 15, 2022
पुढे शाहरुख म्हणाला काहीही असो…तुम्ही आणि मी म्हणजेच पॉझिटीव्ह लोक हे अजूनही जिवंत आहेत…कोरोनामध्ये अनेक लोक गेल्याचे देखील शाहरुख खान बोलला.
कोरोना गेल्याने आता जग परत एकदा नॉर्मल झाल्याने मी खुश आहे, असेही शाहरुख खान बोलताना दिसला. मी सगळ्यात जास्त खुश असल्याचे देखील शाहरुख खान म्हणाला आहे.
शाहरुख खान याचा आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. पठाण चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान हा तब्बल 4 वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.