सोशल मीडियावर #Boycott Pathaan ट्रेंड, कारण काय? आमिर खानप्रमाणेच ‘शाहरुख खान’च्या चित्रपटाला बसणार फटका?
सातत्याने युजर्स सोशल मीडियावर पठाण चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत.
मुंबई : शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या दिवशी पठाण चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आलाय. पठाण चित्रपट सुरूवातीपासूनच चर्चेत आहे. शाहरुख खान तब्बल तीन वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करतोय. मात्र, ज्यादिवशीपासून चित्रपटाचे टीझर रिलीज झाले, त्याचदिवशीपासून सोशल मीडियावर ‘#Boycott Pathaan’ हा ट्रेंड सुरू आहे. आता याचा काय फटका चित्रपटाला बसतो हे पाहवे लागणार आहे. सातत्याने युजर्स सोशल मीडियावर पठाण चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत.
So many segments have been copied from bollywood in #Pathaan. Few parts from Tiger Zinda Hai, some from Saaho and few from War.
SRK saab tum action films karo hi mat yaar, kya bana diya iska ?.
“Emotional” scene between Deepika and SRK was also copied from TZH.#PathaanTeaser pic.twitter.com/dB1nL4uQmR
— KABIR (@SalmansPrestige) November 2, 2022
पठाण चित्रपटाचा टीझर काहींना आवडला आहे तर काहींनी त्यावर टीका केलीये. चित्रपटाचा टीझर रिलीज झाल्यापासून अभिनेता शाहरुख खानला ट्रोल केले जात आहे. पठाण चित्रपट हा हाॅलिवूड चित्रपटांची कॉपी असल्याचे युजर्सचे म्हणणे आहे आणि या चित्रपटात काही वेगळे नसल्याचे देखील युजर्स म्हणत आहेत.
या चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपिका पादुकोण देखील मुख्य भूमिकेत आहे. शाहरुख खानच्या वाढदिवसाच्या दिवशी पठाण चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या फोटोमध्ये दीपिका पादुकोण आणि शाहरुख खान दिसत होता. फोटोमध्ये दीपिका आणि शाहरुखचा लूक कुल दिसतोय.
पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मात्र, आतापासूनच चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरू लागलीये. जॉन अब्राहम देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहे. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडच्या चित्रपटांवर मोठ्या प्रमाणात बहिष्कार टाकला जातोय. यामुळे थेट बाॅक्स आॅफिस कलेक्शनवर याचा परिणाम होतोय. अक्षय कुमार, आमिर खानसारख्या स्टारचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर कमाल दाखू शकले नाहीत.