Shah Rukh Khan | बाॅलिवूडच्या किंगनेच सांगितले चांगल्या वैवाहिक आयुष्याचे रहस्य, शाहरुख खान म्हणाला…

पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठा वाद निर्माण झाला. या चित्रपटावर सतत बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात होती. मात्र, या वादाचा काहीच फरक चित्रपटावर पडला नसल्याचे दिसून आले.

Shah Rukh Khan | बाॅलिवूडच्या किंगनेच सांगितले चांगल्या वैवाहिक आयुष्याचे रहस्य, शाहरुख खान म्हणाला...
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 6:03 PM

मुंबई : शाहरुख खान याने पठाण (Pathaan) चित्रपटाच्या माध्यमातून जोरदार पुनरागमन केले आहे. 25 जानेवारी रोजी शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ सुरूवातीपासूनच बघायला मिळत होती. चित्रपट रिलीज झाला आणि चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर केले. पठाण चित्रपटामध्ये सलमान खान याचा केमिओ देखील बघायला मिळाला. पठाण ज्यावेळी अडचणीमध्ये सापडला होता, त्यावेळी सलमान खान त्याला वाचवण्यास आला असे चित्रपटामध्ये दाखवण्यात आले. झिरो हा चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर शाहरुख खान (Shah Rukh Khan) परत बाॅलिवूड चित्रपटांमध्ये दिसणार की नाही, यावर चर्चा सुरू होत्या. पठाण चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान याने पुनरागमन केले आहे. 2023 हे वर्ष शाहरुख खान याच्यासाठी अत्यंत खास ठरले. कारण चार वर्षांनंतर पुनरागमन करूनही चित्रपटाने धमाकेदार कामगिरी बाॅक्स आॅफिसवर केलीये. गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट सतत बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप जात होते. आमिर खान आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचा यामध्ये सहभाग होता.

पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर मोठा वाद निर्माण झाला. या चित्रपटावर सतत बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात होती. मात्र, या वादाचा काहीच फरक चित्रपटावर पडला नसल्याचे दिसून आले. पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर बजरंग दल देखील आक्रमक झाले होते.

पठाण या चित्रपटामध्ये दीपिका पादुकोण आणि जॉन इब्राहिम हे देखील महत्वाच्या भूमिकेत होते. अनेकांनी शाहरुख खान याच्यासोबतच दीपिका पादुकोण हिच्या अभिनयाचे देखील काैतुक केले. पठाण हा चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदरपासून शाहरुख खान हा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे.

नुकताच शाहरुख खान याने आस्क एसआरके सेशन घेतले. यामध्ये शाहरुख खान हा चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देताना दिसला. चाहत्यांनी असंख्य प्रश्न बाॅलिवूडच्या किंगला विचारले. यावेळी एका चाहत्याने शाहरुख खान याला विचारले की, तुमच्या चांगल्या वैवाहिक जीवनाचे रहस्य काय आहे?

यावर उत्तर देताना शाहरुख खान याने लिहिले की, गौरीचा दिल आणि मन सर्वात सरळ आहे.. तिने आमच्या सर्वांना कुटुंब आणि प्रेमाचा विश्वास दिला आहे, शाहरुख खान याचे हे उत्तर अनेकांना आवडले आहे. पठाण चित्रपटाला रिलीज होऊन जवळपास 25 दिवस झाले असतानाही अजूनही बाॅक्स आॅफिसवर पठाण चित्रपटाची जादू बघायला मिळत आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.