Shah Rukh Bodyguard : डॉक्टर-इंजीनिअरपेक्षाही शाहरुख खानचा बॉडीगार्ड रवी सिंहचा पगार बक्कळ, रक्कम ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

रवी सिंह यांचा बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या बॉडीगार्डच्या यादीत समावेश आहे. (Shah Rukh Khan's Bodyguard Ravi Singh's Salary Is More Than Doctor-Engineer)

Shah Rukh Bodyguard : डॉक्टर-इंजीनिअरपेक्षाही शाहरुख खानचा बॉडीगार्ड रवी सिंहचा पगार बक्कळ, रक्कम ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 1:26 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या बॉडीगार्डच्या (Bodyguard) पगाराची बातमी सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत होती. तर आज आपण शाहरुख खानचा बॉडीगार्ड रवी सिंह याच्या बद्दल बोलणार आहोत. शाहरुख खान जेव्हाही घराबाहेर पडतो तेव्हा त्याला भेटण्यासाठी हजारो चाहते उत्सुक असतात. बॉलिवूडचा बादशाह मुंबईत राहतो. त्यामुळे त्याच्या सुरक्षेसाठी देखील मोठी काळजी घेतली जाते.

शाहरुख खानचा वैयक्तिक बॉडीगार्ड रवी अनेकदा शाहरुखसोबत दिसतो. एवढंच नाही तर शाहरुखनं आपल्या बॉडीगार्डचे नाव राजू असे ठेवले आहे. तर राजू शाहरुख खानसोबत जगभर फिरतो. प्रत्येक अवॉर्ड शो आणि फिल्म प्रमोशनमध्ये राजू शाहरुख खानसोबत दिसतो. अनेक वेळा तो अमेरिकेतही शाहरुखसोबत दिसला आहे. शाहरुख त्याच्या वैयक्तिक बॉडीगार्डवर आणि संपूर्ण सुरक्षा टीमवर खूप पैसा खर्च करतो.

राजूचा पगार किती?

शाहरुख खानची जोरदार फॅन फॉलोइंग पाहता, मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खान त्याच्या बॉडीगार्डला 2.7 कोटी रुपये फी देतो. टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, रवी सिंह यांचा बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या बॉडीगार्डच्या यादीत समावेश आहे. शाहरुख खानसोबत राहत असतानाही रवी बॉलिवूडच्या प्रसिद्धीपासून दूर राहतो आणि शाहरुखसोबत राहूनच त्याचं काम करतो.

केवळ रवीच नाही तर सलमान खान, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण यांचे बॉडीगार्ड देखील बॉलिवूडमध्ये बरेच चर्चेत असतात. हे स्टार्स त्यांच्या वैयक्तिक बॉडीगार्डना करोडो रुपये देखील देतात.

शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो सध्या त्याच्या पुढच्या ‘पठान’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आता तो दीपिका पादुकोणसोबत या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लवकरच स्पेनला रवाना होणार आहे. या चित्रपटाचं बिग बजेट गाणं देखील स्पेनमध्ये शूट केलं जाणार आहे. ज्यासाठी चित्रपटाची संपूर्ण टीम खूप उत्साहित आहे. आपण या चित्रपटात शाहरुख खान सोबत जॉन अब्राहमला मुख्य भूमिकेत बघणार आहोत. जॉननं काही दिवसांपूर्वी मुंबईत त्याच्या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. जॉन अलीकडेच यशराज स्टुडिओच्या बाहेर दिसला होता. शाहरुख, दीपिका आणि जॉनचा हा चित्रपट प्रेक्षकांना किती आवडतो हे पाहण्यासारखं असेल. जॉन आणि शाहरुख एकमेकांसोबत काम करण्याची ही पहिलीच वेळ असेल.

संबंधित बातम्या

Pathan : ‘पठान’च्या गाण्याच्या शूटिंगसाठी शाहरुख-दीपिका जाणार स्पेनला, जाणून घ्या आणखी काय खास

Shweta Tiwari : हॉट मॉम श्वेता तिवारीच्या दिलखेचक अदा, ग्लॅमरस फोटोंवर चाहते फिदा

Birthday Special : सिनेमातील अभिनेत्यांचा दोस्त; पत्नीसोबतच्या वादामुळेही चर्चेत, दीपक तिजोरीचा फिल्मी प्रवास रंजक आणि वादळीही

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.