SRK Mannat | दोन जण मन्नत बंगल्यामध्ये घुसले, शाहरुख खान नेमका कुठे? महत्वाची माहिती उघड
शाहरुख खान याच्या मुंबईतील मन्नत बंगल्यामध्ये दोन जणांनी घुसखोरी केलीये. यामुळे अभिनेत्याच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. हे दोन जण नेमके कोण आहेत, हा प्रश्न सतत चाहत्यांकडून विचारला जातोय. शाहरुख खान हा त्याच्या पठाण चित्रपटामुळे चर्चेत आहे.
मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने आतापर्यंत अनेक रेकाॅर्ड आपल्या नावावर केले आहेत. पठाण हा चित्रपट शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट (Movie) ठरला आहे. शाहरुख खान याचा मुंबईमधील मन्नत बंगला कायमच चर्चेत राहतो. देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारे चाहते शाहरुख खान याच्या या बंगल्याला भेट देऊन फोटो घेतात. इतकेच नाहीतर शाहरुख खान हा त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी बंगल्याबाहेर येत आपल्या चाहत्यांचे प्रेम स्वीकारतो.
नुकताच शाहरुख खान याच्या मन्नत या बंगल्यात अशी एक घटना घडली, जी ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. गुरूवारी रात्री दोन तरुणांनी मन्नतच्या भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश केला. विशेष म्हणजे हे तरुण थेट बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यापर्यंतही पोहचले होते. या दोन्ही तरुणांना अटक करण्यात आलीये.
दोन तरुण मन्नत बंगल्यात शिरल्यानंतर शाहरुख खान हा नेमका त्यावेळी कुठे होता? हा प्रश्न चाहत्यांकडून विचारला जातोय. आता याबाबत एक महत्वाची माहिती पुढे आलीये. ज्यावेळी हे दोन तरुण बंगल्यामध्ये घुसले होते, त्यावेळी शाहरुख खान हा मन्नतमध्ये नव्हता. पहाटे शाहरुख खान हा घरी पोहचला.
शाहरुख खान हा सध्या त्याच्या आगामी जवान या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ज्यावेळी या तरुणांनी बंगल्यात घुसखोरी केली, त्यावेळी शाहरुख खान हा जवान चित्रपटाचे शूटिंग करत होता. हे दोन्ही तरुण गुजरातमधील सुरत येथील असल्याचे सांगण्यात येतंय. साधारण 20 ते 25 वय या तरुणांचे आहे.
पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हे दोघे शाहरुख खान याला भेटण्याठी बंगल्यात गेल्याचे त्यांनी सांगितले. शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर तूफान कामगिरी केलीये. या चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड असा प्रतिसाद नक्कीच दिलाय. अजूनही या चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये बघायला मिळत आहे.
2019 मध्ये शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला होता. त्यानंतर शाहरुख खान हा मोठ्या पडद्यापासून दूर होता. शाहरुख खान याचे चाहते त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहात होते. मात्र, तब्बल चार वर्ष शाहरुख खान हा बाॅलिवूड चित्रपटांमध्ये दिसला नव्हता.