Pathaan Box Office Collection | दंगल चित्रपटाचे रेकॉर्ड तोडत पठाण तयार करणार मोठा विक्रम, पाहा बाॅक्स ऑफिस कलेक्शन

पठाण चित्रपट (Movie) रिलीज झाल्यापासून अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर करत आहे. या चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.

Pathaan Box Office Collection | दंगल चित्रपटाचे रेकॉर्ड तोडत पठाण तयार करणार मोठा विक्रम, पाहा बाॅक्स ऑफिस कलेक्शन
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 9:01 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा पठाण (Pathaan) हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर सुसाट कामगिरी करतोय. चित्रपटाचे ओपनिंग जबरदस्त करत शाहरुख खान याने दाखवून दिले की, उगाच त्याला बाॅलिवूडचा किंग म्हटले जात नाही. विशेष म्हणजे या चित्रपटाला जीवंत ठेवण्यासाठी सलमान खान (Salman Khan) हा देखील शाहरुख खान याच्या मदतीला धावून आलाय. या चित्रपटामध्ये सलमान खान याचा केमिओ आहे. सलमान खान आणि शाहरुख खान हे दोघेसोबत स्क्रीन शेअर करणार असल्याने या चित्रपटाबद्दल मोठी आतुरता प्रेक्षकांमध्ये होती. शाहरुख खान याच्या जीवाला धोका होता, त्यावेळी सलमान खान हा धावून येत त्याला वाचवतो असे चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट २५ जानेवारी रोजी रिलीज झालाय. चित्रपट (Movie) रिलीज झाल्यापासून अनेक रेकाॅर्ड हे आपल्या नावावर करत आहे. या चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात होती.

शाहरुख खान याने पठाण चित्रपटाच्या माध्यमातून तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. २०१९ मध्ये शाहरुख खान याचा झिरो हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला.

पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यावर दीपिका पादुकोण हिच्या भगव्या बिकिनीवर वाद निर्माण झाला होता. मात्र, या वादामध्ये शाहरुख खान किंवा चित्रपटाशी संबंधित कोणत्याच व्यक्तीने काही भाष्य केले नव्हते.

पठाण हा चित्रपट रिलीज झाल्यापासून अनेक रेकाॅर्ड तोडत आहे. बाॅलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा आमिर खान याचा दंगल हा चित्रपट आहे. या चित्रपटाने सर्वाधिक कमाई बाॅक्स आॅफिसवर केलीये.

दंगल या चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर एकून 387.38 कोटींचे कलेक्शन केले होते. हा सर्वाधिक कमाई करणार चित्रपट ठरला. मात्र, आता पठाण हा चित्रपट दंगल चित्रपटाचे पुढच्या आठवड्यापर्यंत रेकाॅर्ड तोडेल असे सांगितले जात आहे.

पठाण या चित्रपटाने ओपनिंग डेला ५४ कोटी, दुसऱ्या दिवशी २६ जानेवारी रोजी ७०.५ कोटी, तिसऱ्या दिवशी शुक्रवारी ३९.२५ कोटी, शनिवारी ५३.२५ कोटी, रविवारी ६०.७५ कोटी, सोमवारी २६.५ कोटी, मंगलवारी २३ कोटी आणि बुधवारी १८. २५ कोटींची कमाई केली आहे. येणाऱ्या विकेंडचा फायदा चित्रपटाला होण्याची शक्यता आहे.

पठाण चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यावरून आता हे स्पष्ट होते की, चित्रपट दंगल चित्रपटाचे रेकाॅर्ड मोठण्यास तयार आहे. पठाण चित्रपट हा शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट देखील ठरला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.