शाहरुख खानच्या पत्नीनेच मनातील सल बोलून दाखवली; म्हणाली…
गौरी आणि शाहरुख यांनी 25 ऑक्टोबर 1991 रोजी लग्न केले. गौरी आणि शाहरुख यांचे लव्ह मॅरेज झाले असून गौरीचे शिक्षण दिल्ली येथे झाले असून गौरीने इतिहासामध्ये डिग्री केलीये.
मुंबई : बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानची (Shah Rukh Khan) रिअल लाइफ क्वीन अर्थात गौरी खानबद्दल (Gauri Khan) सर्वांनाच माहितीये. एका सुपरस्टारची पत्नी म्हणून गौरीला ओळखले जाते. मात्र, गौरीने स्वत: च्या मेहनतीवर एक वेगळी ओळख नक्कीच कमावलीये. गौरीचा आज वाढदिवस आहे. गौरी खान एक यशस्वी महिला व्यावसायिक आहे. इंटिरियर आणि फॅशन डिझायनर्स क्षेत्रात गौरीने एक वेगळी ओळख निर्माण केलीये. इतकेच नाही तर गौरी खान रेड चिलीज एंटरटेनमेंट (Entertainment) या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत चित्रपटांची निर्मिती देखील करते.
गौरी आणि शाहरुख यांनी 25 ऑक्टोबर 1991 रोजी लग्न केले. गौरी आणि शाहरुख यांचे लव्ह मॅरेज झाले असून गौरीचे शिक्षण दिल्ली येथे झाले असून गौरीने इतिहासामध्ये डिग्री केलीये. बाॅलिवूडच्या प्रत्येक पार्टी आणि कार्यक्रमांमध्ये गौरी हजेरी लावते. गौरीकडे कोणीच पाहून म्हणणार नाही की, ही तीन मुलांची आई आहे. गौरीच्या ग्लॅमरस लूकची कायम चर्चा देखील होते.
शाहरुख खानची पत्नी असल्यामुळे गौरी खानला अनेकदा मोठी किंमत मोजावी लागलीये. मी जेंव्हा नवीन काम हाती घेते त्यावेळी बरेच लोक माझे काम पाहून मला काम देतात. मात्र, बरेच लोक मी शाहरुख खानची पत्नी असल्याने मला काम देणे टाळतात. ते माझ्याकडे इंटिरियर डिझायनर म्हणून पाहत नाही तर ते माझ्याकडे शाहरुख खानची पत्नी म्हणून पाहतात. सेलिब्रिटी पत्नीचा टॅग लावला जातो.