Shahid Kapoor | धर्मा प्रॉडक्शनच्या बिग बजेट चित्रपटातून शाहिद कपूर आऊट! वाचा काय घडलं..

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर   (Shahid Kapoor)सध्या आपल्या आगामी जर्सी (Jersey) चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Shahid Kapoor | धर्मा प्रॉडक्शनच्या बिग बजेट चित्रपटातून शाहिद कपूर आऊट! वाचा काय घडलं..
Follow us
| Updated on: Dec 24, 2020 | 6:03 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) सध्या आपल्या आगामी जर्सी (Jersey) चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. मात्र, यादरम्यान, शशांक खेतान (Shashank Khaitan) निर्देशित आणि धर्मा प्रोडक्शन निर्मित ‘योद्धा’ (Yodha) चित्रपटात शाहिद कपूर दिसणार नसल्याचे वृत्त आहे. असे म्हटले जात आहे की, स्वत: शाहिद कपूरने हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे. शाहिदसोबत दिशा पाटनी या चित्रपटात त्यांच्यासोबत दिसणार होती. (Shahid Kapoor out of Dharma Production’s ‘Yodha’ movie)

मीडिया रिपोर्टनुसार शाहिद कपूर जर्सीचे शूटिंग पूर्ण होताच या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार होता, पण आता शाहिदनेच चित्रपटास नकार दिला आहे. कबीर सिंहनंतर शाहिद कपूरने त्याची फी वाढविली आहे. ज्यामुळे तो आता चित्रपटाच्या स्टोरीवर जास्त लक्ष केंद्रित करत आहे. योद्धा चित्रपटातील काही भाग बदलावा अशी शाहिदची इच्छा होती.

परंतु, चित्रपटाच्या निर्मात्यांना ते मान्य नव्हते. ज्यामुळे शाहिद कपूरने या चित्रपटापासून दूर जाण्याचा विचार केला. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार शाहिद कपूरने हा चित्रपट सोडला आहे. तो यापुढे या चित्रपटाचा भाग नसणार आहे. कबीर सिंगनंतर शाहिद कपूर फारच कमी चित्रपट साईन केले आहेत. शाहिदचा येणारा चित्रपट जर्सी बॉक्स ऑफिसवर किती कमाल करतो हे पाहण्यासारखे आहे.

कोरोनाकाळात अनेक बड्या कलाकारांनी ओटीटी प्लॅटफॉर्मला पसंती दिली आहे. अमिताभपासून अभिषेक बच्चनपर्यंत अनेक कलाकारांनी आपले चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केले आहेत. आता शाहीदही या दिशेन आपले पाऊल टाकत आहे.

‘कबीर सिंह’ चित्रपट हिट झाल्यानंतर शाहीद कपूरचे स्टार झळकले आहेत. त्यानंतर त्याला आता अनेक बड्या चित्रपटाच्या ऑफर येत आहेत. बॉलिवूडशी संबंधित प्रत्येक दिग्दर्शक, निर्मात त्याला आपल्या चित्रपटात घेण्यास ईच्छुक आहे.

कबीर सिंह चित्रपट हिट झाल्यानंतर शाहीदच्या फीमध्येही मोठी वाढ झाली असल्याचे म्हटलं जात आहे. दरम्यान, शाहीदचा नवीन चित्रपट जर्सीची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. जर्सी चित्रपटात शाहीद एका क्रिकेटरची भूमिका निभावत आहे.

संबंधित बातम्या : 

Coolie No. 1 |’कुली नंबर. 1′ चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अगोदरच चर्चेत!

Kangana Ranaut | ट्रोलर्सला कंगनाचे जोरदार प्रत्युत्तर, धर्माच्या मार्गाने चला, धर्माचे ठेकेदार बनू नका!

(Shahid Kapoor out of Dharma Production’s ‘Yodha’ movie)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.